बारामती : अनेक बडी मंडळी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेल्या ‘बारामती क्लब’ चा वीजपुरवठा 24 लाख 66 हजार रूपये थकबाकी असल्याने आज खंडीत करण्यात आला. थकीत रक्कमेपैकी 5 लाख रूपये क्लबच्या व्यवस्थापनाने भरले होते. मात्र 19 लाख 66 हजारांच्या थकित वीजबिलासाठी महावितरणने 21 ऑक्टोबर 2क्14 रेाजी क्लबला थकीत वीज बिलाची नोटीस दिली होती. मात्र 31 ऑक्टोबर्पयत उर्वरित थकीत वीज बील भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
बारामती क्लबने नुकताच पहिला वर्धापन दिन साजरा केला आहे. मुंबई आणि बंगलोरच्या क्लब बरोबर या क्लबची संलग्नता आहे, असे सांगितले जाते. तरीदेखील विज बील थकविल्याने वेगळीच चर्चा सुरू आहे.
दरम्यान क्लबचे व्यवस्थापक संदेश शेट्टी यांनी ‘लेाकमत’शी बोलताना सांगितले की, जुनी थकबाकी भरण्यात येत आहे. 5 लाख थकबाकी पोटी भरण्यात आले आहे. एकाच वेळी थकित वीजबिलाची मोठी रक्कम असल्याने भरणा करणो शक्य नव्हते.
सेामवारी (दि.क्3)हा भरणा करण्यात येईल. सध्या वीजपुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. आता र्पयत या क्लबला सवलत महावितरणने दिली. मात्र, नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर दुस:याच दिवशी या क्लबचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)
वीजबिलात
सवलत का?
वीजबिल थकल्याने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वीजबिलाची थकबाकी वाढत असताना वीज महावितरण अधिका:यांनी बारामती क्लबला सवलत का दिली, अशी विचारणा केली जात आहे.