शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:48 IST

बारामतीमध्ये बोलताना शरद पवार यांनी राज्यातून परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Baramati Assembly constituency : लोकसभेनंतर आता बारातमीच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात ही लढत होणार असल्याने पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा लागली आहे. या लढतीकडे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवारबारामतीमध्ये सभांचा धडाका लावला आहे. सुपा येथे एका सभेत बोलताना शरद पवार यांनी राज्यातून परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका राज्याचं काम करायचं असेल तर पंतप्रधान कशाला होता? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.

बारातमी विधानसभेची निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. गेली ३५ वर्षे बारामतीचे नेतृत्व करणाऱ्या अजित पवार यांच्यासमोर त्यांचे सख्खे पुतणे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यामुळेच शरद पवार यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष दिले आहे.  सुपा येथे जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. गुजरातचं कल्याण करा. पण महाराष्ट्राचं नुकसान करू नका, असं शरद पवारांनी म्हटलं.

"पंतप्रधानांनी देशाचा आणि मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच टाटांशी काय बोलणं काय माहीत नाही. काय जादू झाली माहीत नाही. नागपूरमध्ये विमान बनवण्याचा कारखाना होणार होता. तो गुजरातला नेला. इथे हाताला काम नाही. मोबाईलची चीप बनवणारी कंपनी फॉक्सकॉनचा कारखाना महाराष्ट्रात करायचा होता. वेदांतावाल्यांना पंतप्रधान मोदींनी बोलावून घेतलं. काय जादू केली माहीत नाही. तो महाराष्ट्रातील कारखाना गुजरातला नेला. मी गुजरातच्या विरोधात नाही. गुजरातचं कल्याण करा पण महाराष्ट्राचंही कल्याण करा. महाराष्ट्राचं नुकसान करू नका,” असं शरद पवार म्हणाले.

"तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. पण तुम्ही फक्त एका राज्याचं काम करत असाल तर पंतप्रधान कशाला होता? जाऊन तिथे मुख्यमंत्री व्हा. माझी काही तक्रार नाही. पण हे जे काही घडतंय ते राज्याच्या हिताचं नाही. देशाच्या हिताचं नाही. अनेक राज्यात हाताला काम नाही. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची, ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही,” असंही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवार