शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

मुंबईवर बाप्पाकृपा!

By admin | Updated: September 21, 2015 02:02 IST

कधी रिमझिम तर कधी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची मुंबईवर चांगलीच कृपा होत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मोडक सागर धरण भरून वाहू लागले आहे.

मुंबई : कधी रिमझिम तर कधी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची मुंबईवर चांगलीच कृपा होत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मोडक सागर धरण भरून वाहू लागले आहे. तसेच २२ दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर असलेली पाणीकपात ३० टक्क्यांवर जाण्याची शक्यता मावळली आहे. उलटपक्षी पाणीकपातच मागे घेतली जाण्याची चिन्हे आहेत. महिना-दीड महिना पावसाने ओढ दिल्याने मुंबईवर २० टक्के पाणीकपातीची कुऱ्हाड कोसळली. औद्योगिक क्षेत्रासाठी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. बाप्पाच्या आगमनासोबत आलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात जोरदार बरसात केली. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ३ वाजेनंतर मोडक सागर धरण भरून वाहू लागले; तर सायंकाळपर्यंत तानसा धरणात १२७.६६ मीटर, विहारमध्ये ७७.०२ मीटर, तुळशीमध्ये १३९.९ आणि मध्य वैतरणाच्या साठ्यात २८४.२८ मीटर पातळीपर्यंत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)संततधारेचा फटका!मुंबईत रात्रभर कोसळलेल्या संततधारेने शहरासह उपनगरांत काही ठिकाणी पाणी तुंबले. परळमधील हिंदमाता परिसरात सकाळी पाणी तुंबल्याने स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे लोकलही दुपारपर्यंत उशिराने धावत होत्या.राज्यात पावसाचा जोर ओसरलाउत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैर्ऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते आता सौराष्ट्र व लगतच्या भागावर निर्माण आहे़ यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे़ पुढील दोन दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ १ आॅक्टोबरला पाणीसाठ्याची माहिती घेतल्यानंतरच कपातीबाबत निर्णय घेणार असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय किमान ८ ते १० दिवस संततधार कोसळल्यास पाणीकपात रद्द होण्याची शक्यताही त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.आॅक्टोबरमध्ये निर्णय ?तलाव आजची पातळी खोलीमोडक सागर १६२.८६१६३.१५तानसा१२७.५६१२८.६३विहार७६.९७८०.१२तुळशी१३९.०२१३९.१७अपर वैतरणा६००.२८६०३.५१भातसा१३३.१३१४२.०७मध्य वैतरणा२८४.३०२८५(आकडेवारी मीटरमध्ये)