शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!; भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 15:37 IST

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गणरायाचे गंगाघाटावर नदीपात्रात विसर्जन करून भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.गणरायाचे गंगाघाटावर नदीपात्रात विसर्जन करून भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.

नाशिक, दि. 5- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गणरायाचे गंगाघाटावर नदीपात्रात विसर्जन करून भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. बाप्पांना निरोप देण्यासाठी अवघे कुटूंब एकवटले होते. लाडक्या गणरायाला निरोप देतांनाच पुढल्या वर्षी लवकर या असा नारा गणेश भक्तांनी दिला.पंचवटी परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक मित्रमंडळाच्यावतीने गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सकाळी घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्यांनी गंगाघाटावरील गौरी पटांगण, म्हसोबा महाराज पटांगण, तपोवन, रामवाडी गोदापार्क परिसरात गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती. 

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांनी ढोल ताशा तसेच डीजे साऊंड लावून मिरवणूक काढून विविध हिंदी, मराठी गाण्यांवर तर कोणी ढोल ताशांवर ठेका धरुन गुलालाची उधळण करून मनमुराद नाचण्याचा आनंद लुटला. सकाळी घरात बाप्पांची आरती करण्यात येऊन बाप्पांच्या आवडीचे मोदक नैवेद्य म्हणून चढविण्यात आले. 

गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत महिला भाविक, बालगोपाळ मोठया संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी तसेच पुरूषांनी डोक्यावर भगवे, लाल रंगाचे फेटे व टोप्या परिधान केल्या होत्या तर काही महिलांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. युवक वर्गाने कपाळावर गणपती बाप्पा मोरया असे लिहलेल्या पट्टया बांधलेल्या होत्या. विघ्नहर्त्याला कोणी खांद्यावर तर कोणी दुचाकी, चारचाकी वाहनातून विसर्जन करण्यासाठी नेत होते. गंगाघाटावर विघ्नहर्त्याला निरोप देतांना कुटूंबातील सर्व सदस्यांनी आरती करून बाप्पांना पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनवणी केली. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव