शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी, जिरा टोस्टच्या पाकिटात केसांचा गुच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 21:56 IST

मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी तर जीरा टोस्टच्या पाकिटात चक्क केसांचा गुच्छ आढळला.

अमरावती, दि. 7 - मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी तर जीरा टोस्टच्या पाकिटात चक्क केसांचा गुच्छ आढळला. ही घटना राजापेठ  येथील ‘मनभरी  फुडमार्ट शिल्पी कॉम्पलेक्स’ येथे गुरुवारी दुपारी 2.55 वाजता घडली. ग्राहकाने मनभरीच्या दोन्ही उत्पादनांचे सीलबंद पाकीट येथील अन्न व प्रशासन विभागाकडे नेऊन  लेखी तक्रार नोंदविली.रुक्मिणीनगर येथील मेघा निरज चेड या मनभरीच्या राजापेठ येथील फुडमार्टमध्ये गेल्या होत्या. येथून त्यांनी 200 रुपयांचे खाद्यपदार्थ खरेदी केले.  मनभरीची गोड नानखटाई व मनभरी जीरा टोस्ट खरेदी केले व त्या घरी आल्या. लहान मुलांना जीरा टोस्ट व नानकटाई देत असताना त्यांना तळलेली मुंगी व केसांचा गुच्छ आढळून आला. त्यानंतर त्यांचे पती नीरज चेडे यांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र येते, गौतम देशपांडे, रामभाऊ भायदे यांना सांगितली. त्यांना सोबत घेऊन नीरज चेडे हे सायंकाळी 6 वाजता एफडीएचे कार्यालय गाठले. अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त अन्नपुरे यांना घडलेला प्रकार सांगितला. खरेदी केलेल्या मनभरीच्या खाद्यपदार्थांचे बिल देखील दाखविले. मनभरी चिवड्यात आढळली होती पालयापूर्वी सुद्धा मनभरीच्या चिवड्यात तळलेली पाल आढळली होती. तत्पूर्वी रघुवीरच्या कचोरीत अळी आढळली होती. ‘मनभरी’च्या उत्पादनांबाबत यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हे पदार्थ सेवन करणाºयांच्या आरोग्याला धोका संभवतो. आता जीरा टोस्टमध्ये केसांचा गुच्छ व नानकटाईमध्ये तळलेली मुंगी आढळल्याने या प्रॉडक्ट्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ‘प्रीमी फुड प्रा.लि.’ चे उत्पादन मनभरीच्या जीरा टोस्टच्या पाकिटात केसांचा गुच्छ आढळला आहे. याचे उत्पादक प्रीमी फुड प्रा.लि.च्या नावाने असून हा कारखाना अकोला मार्गावरील दाभा येथे आहे. उपरोक्त उल्लेख उत्पादनांच्या पाकिटावर करण्यात आला आहे. त्यामुळे एफडीएने याची पारदर्शक चौक शी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एफडीएच्या अधिका-यांनी मेघा चेडे यांना लेखी तक्रार देण्याचा सल्ला दिला. तक्रारीनंतर त्यांनी मनभरीच्या टोस्टचे आणि नानकटाईचे पाकिट जप्त केले. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. यावेळी अन्न व सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे उपस्थित होते. याप्रकाराबाबत एफडीएच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.