शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 13:16 IST

बाळासाहेब थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीयही मानले जातात. त्याचप्रमाणे सत्यजित तांबे हे देखील राहुल गांधींच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात.

मुंबई - अनके दिवसांपासून सुरु असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेला काँग्रेस नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीने पूर्ण विराम मिळाले आहे. थोरात यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील काँग्रेसचा संपूर्ण धुरा आता मामा-भाच्याच्या हातात आहे. त्याचे कारण असे की, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का अशीही चर्चा पहायला मिळत आहे.

बाळासाहेब थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीयही मानले जातात. त्याचप्रमाणे सत्यजित तांबे हे देखील राहुल गांधींच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात. लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता काँग्रेसचे लक्ष विधानसभा निवडणुकांकडे लागले आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर आली होती. मात्र अखेर थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद थोरात यांच्याकडे आहे तर दुसरीकडे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांचे भाचे सत्यजित तांबेंकडे आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची जवाबदारी मामा-भाच्याकडे आली असल्याचे बोलले जात आहे.

सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसची जबाबदारी स्वीकारल्यापासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यातच त्यांनी वेळोवेळी सरकार विरोधात आक्रमक आंदोलने सुद्धा केल्याची पहायला मिळाली. तर थोरात यांच्याकडे मोठा राजकीय अनुभूव आहे. त्यामुळे मामा-भाच्याची जोडी पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन आणणार का हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.