शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन साकारणार बाळासाहेब ! टीझर झाला लाँच : 23 जानेवारीला रीलीज होणार सिनेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 04:02 IST

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाचा गुरुवारी टीझर लाँच करण्यात आला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सिनेमा २३ जानेवारी २०१९ रोजी रीलीज होणार आहे. बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी साकारणार आहे.

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाचा गुरुवारी टीझर लाँच करण्यात आला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सिनेमा २३ जानेवारी २०१९ रोजी रीलीज होणार आहे. बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी साकारणार आहे.याप्रसंगी शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांसोबत जास्त काळ व्यतित केला आहे, त्यांना मी जास्त ओळखतो. त्यांच्या आयुष्यात असे बरेच आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवले जाऊ शकते. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा सिनेमा लोकप्रिय व्हावा असे वाटते. तर हा सिनेमा फक्त माझ्या वडिलांवर नाही, तर ज्या व्यक्तीने इतिहास घडवला त्या व्यक्तीवर आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य तीन तासांत सामावू शकत नाही, त्यासाठी खरे तर वेबसीरिज काढली पाहिजे, असे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितले. ते म्हणाले, बाळासाहेब यांच्यासोबत जवळचे संबंध होते. त्यांनी नेहमीच मला त्यांच्या कुटुंबाचा भाग समजले. ज्या वेळी माझे लग्न झाले, त्या वेळेस त्यांनी पत्नीसह मला मातोश्रीवर बोलाविले होते.त्याप्रसंगी माँसाहेबांनी जयाचे सुनेप्रमाणे स्वागत केले होते. बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना रुग्णालयात भेटायला गेलो असताना त्या खोलीत माझा फोटो होता, तो पाहून अक्षरश: कृतज्ञ झालो, अशा शब्दांत बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेना नेते संजय राऊत या चित्रपटाची निर्मिती करणार असून, अभिजित पानसे दिग्दर्शक असतील. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्षे लागली....अन् नवाजुद्दीन मराठीत बोलला-टीझर लाँचिगवेळी नवाजुद्दीन सिद्दिकी उपस्थित नव्हता. मात्र, त्याने व्हिडीओच्या माध्यमातून चित्रपटाविषयी आणि बाळासाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी चक्क त्याने मराठीतून संवाद साधत ‘मला मराठी चांगलं बोलता येतं’ असे आर्वजून नमूद केले.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेNawazuddin Siddiquiनवाझुद्दीन सिद्दीकी