शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

बिअर शॉपी बनल्या तळीरामांचे बार

By admin | Updated: June 9, 2017 23:54 IST

शहरातील विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात बिअर शॉपी आहेत. या बिअर शॉपीच तळीरामांचे अड्डे बनल्या असल्याचे पाहणीत समोर आले.

राम शिनगारे, ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 9 : शहरातील विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात बिअर शॉपी आहेत. या बिअर शॉपीच तळीरामांचे अड्डे बनल्या असल्याचे पाहणीत समोर आले. बिअर शॉपीतच तळीरामांना पिण्यासाठी प्लॉस्टीक ग्लास, चकणाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळीरामांना बिअरबारमध्ये जाऊन अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही अन् बिअर शॉपी मालकांना रिकाम्या बाटल्या, चकण्याच्या विक्रीतुन अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. यामुळे वसाहतींमधील बिअर शॉपी तळीरामांनी गजबलेल्या दिसून येत आहेत.राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर होणारे अपघात हे वाहनचालकांनी ड्रिंक केल्यामुळे घडत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही महामार्गावर ५०० मिटरच्या आत सर्व बिअरबार बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे महामर्गांवर असणाऱ्या बिअरबारला टाळे लागले आहेत. याचा फटका तळीरामांना बसला आहे. जे बिअरबार महामार्गावर नाहीत. त्या ठिकाणी बिअर दर अव्वाच्या सव्वा पध्दतीने आकरण्यात येतात. हा आर्थिक भुर्दंड सहन करणे दररोजच ढोसणाऱ्यांना कठिण असल्यामुळे अनेकांनी बिअर शॉपीकडे आपला मोर्चा वळवला आहे. बिअर शॉपीवर फक्त बंद बाटल्यातच बिअर विकण्यास परवानगी असते. मात्र विकत घेतलेली बिअर कुठे प्यावी? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घरी घेऊन जाणे शक्य नाही. हॉटेलमध्ये जावे तर मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या सर्व समस्यांवर बिअर शॉपी आणि तळीरामांना चांगलाच तोडगा काढला आहे. बिअर शॉपीमध्ये चार- पाच खुर्च्या टाकलेल्या दिसून येतात. त्याठिकाणीच एक ग्रुपचे झााले की दुसरा ग्रुप पिण्यासाठी हजर असतो, असा प्रकार शहरातील बहुतांश बिअर शॉपीवर केलेल्या पाहणीत दिसून आला.

कुठे आडोसा...कुठे वरचा मजलारेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या एका बिअर शॉपी मालकाने तळीरामांना पिण्यासाठी दुकानाच्या बाजूलाच आडोसा उभारला आहे. या ठिकाणी तळीराम बिअर ढोसत असल्याचे दिसून आले. त्याच शॉपीच्या समोर लावलेल्या गाड्यांमध्ये ही ह्यराष्ट्रीय कार्यक्रमह्ण सुरू असल्याचे पाहायला मिळाले. उच्चभ्रु वस्ती असलेल्या ज्योतीनगरच्या नाक्यावर असलेल्या एका बिअर शॉपी मालकाने तर चक्क वरचा मजलाच तळीरामांना उपलब्ध करून दिला आहे. या मजल्यावर जाण्याचा रस्ता ही बिअर शॉपीतुनच आहे हे विशेष.

संध्याकाळी होते गर्दीबहुतांश बिअर शॉपीवर सायंकाळी पाच वाजेपासून तळीरामांची गर्दी होण्यास सुरुवात होते. ही गर्दी उत्तरोत्तर वाढतच जाते. अनेक शॉपीच्या बाहेर तर जत्रेचे स्वरूप येते. याचा त्रास शेजारील दुकानदार, नागरिकांनाही होत आहे. कोणाला काही बोलण्याचा प्रयत्न केल्यास तळीराम वाद घालण्याच्या शक्यतेमुळे न बोलले बरे असल्याची प्रतिक्रिया एका नागरिकाने ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.

नियम काय सांगतोसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महामार्गांवरील बिअरबारला टाळे ठोकले आहे. याचा परिणाम नागरी वस्त्यांमध्ये असलेल्या बिअरबारचे भाव वधारण्यात झाला. यामुळे तळीरामांचा ओढा बिअर शॉपीकडे वाढला आहे. मात्र बिअर शॉपी मालकांना केवळ बंद बाटलीतच बिअर विकण्याचा परवाना आहे. शॉपीत किंवा परिसरात तळीरांना पिण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण हे पुर्णपणे नियमबाह्य असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे शहर निरिक्षक शिवाजी वानखेडे यांनी सांगितले.