शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Bachchu Kadu : 'निर्णयाचे स्वागत, पण...'; कोर्टाच्या निर्णयानंतर बच्चू कडूंची पहिलीच प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:29 IST

Bachchu Kadu : कोर्टाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू, ते आम्हाला न्याय देईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

अमरावती : राज्य सरकारमधील महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी बच्चू कडू यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू, ते आम्हाला न्याय देईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

बच्चू कडू म्हणाले, 2014 च्या आगोदर आमदारांच्या घरासाठी सोसायटी केली होती. सगळ्या आमदारांना शासनाने या घरांच्या कर्जाची हमी घेतली होती. त्याच घरांवर आपण कर्ज काढले. कर्जाची रक्कम निवडणूक आयोगाला कळवली होती. पण फक्त घराचा क्रमांक कळवला नव्हता. मात्र, कर्जाचे घर असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिलेली आहे.

याचबरोबर, ती जी काही चूक झाली होती, ती काही जाणीवपूर्वक केली नव्हती. मात्र, तरीही न्यायालयाचा निर्णय चूक असला तरी न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचे स्वागत करतो. माझ्याविरोधात सूड भावनेने तक्रार दाखल करण्यात आली. आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू, ते आम्हाला न्याय देईल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण?राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात मुंबईतील अंधेरी येथे 2011 मध्ये सदनिका विकत घेतली, परंतु ही माहिती त्यांनी शपथ पत्रात दडविली होती.  या गंभीर प्रकरणी चांदूरबाजार तालुक्याचे भाजप सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी 27 डिसेंबर 2017 रोजी आसेगाव पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.  या प्रकरणी पाच वर्षांनी शुक्रवारी चांदूरबाजार येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक १ यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड  ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी वकील वानखडे यांनी त्यांची बाजू मांडली. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीCourtन्यायालय