शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

‘बकचोच तुतारी’चा रशिया-मुंबई-रशिया प्रवास

By admin | Updated: May 11, 2017 01:44 IST

स्थलांतरित पक्ष्यांंसाठी मुंबईचे हवामान अनुकूल असून, या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. स्थलांतरित

अक्षय चोरगे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्थलांतरित पक्ष्यांंसाठी मुंबईचे हवामान अनुकूल असून, या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. स्थलांतरित पक्ष्यांमधील रशियातून येथे दाखल होत असलेला ‘बकचोच तुतारी’ हा पक्षी सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत असून, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या बर्ड रिंगिग संशोधनातील हा एक महत्त्वपूर्ण पक्षी आहे. या पक्ष्याची नोंद शिवडी आणि नवी मुंबईच्या खाडी परिसरात झाली आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नव्वद वर्षे बर्ड रिंगिगद्वारे पक्ष्यांच्या स्थलांतरावर संशोधन होत आहे. या संशोधनात बकचोच तुतारी (- लांब चोच असलेला पक्षी) हा रशियात आढळणारा पक्षी दरवर्षी रशिया-मुंबई-रशिया असा प्रवास करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर २०१४ ते फेबु्रवारी २०१५ या काळात मुंबईत अनेक ठिकाणी बीएनएचएसने बर्ड रिगिंग केले. त्या काळात बर्ड रिंगिंग केलेले पक्षी हिवाळा संपल्यानंतर, मायदेशी परतले. त्यातील बकचोच तुतारी या प्रजातीचे पक्षी रशियाला परतले, त्यापैकी काही पक्षी पक्षीतज्ज्ञांना मुंबईतील शिवडीची खाडी आणि नवी मुंबई परिसरात पाहायला मिळाले. असा असतो बकचोच तुतारी -हिवाळ्यात मुंबईत स्थलांतरित झालेले पक्षी उन्हाळ्यात मायदेशी परतू लागले आहेत. बकचोच तुतारी पक्ष्यांनीसुद्धा रशियाची वाट धरली आहे. बकचोच तुतारीला इंग्रजीमध्ये ‘कर्ल्यु सँडपायपर’ असे म्हटले जाते. त्याचे शास्त्रीय नाव ‘कॅलिड्रीस फेरुगिनिआ’ असे आहे. १९ ते २१ सेंमी उंच आणि ७.७ ते ८.३ सेंमी लांब असणाऱ्या हा पक्षी गडद राखाडी रंगाचा असतो. तसेच वरच्या भागात विटकरी लाल रंगाची पिसे असतात. खाडीजवळ चिखल आणि दलदलीच्या प्रदेशात हे पक्षी किडे टिपतात. त्यांचे मुख्य खाद्य किडेच आहेत.