शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

Bacchu Kadu : "मी फक्त नावापुरता अध्यक्ष, निवडणुकीत दखल घ्यावी लागेल", बच्चू कडूंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:18 IST

Bacchu Kadu : मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे. जर सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडू दिला आहे.  

Bacchu Kadu : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत. तसंच, प्रत्येक पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, महायुतीत सामील असलेल्या प्रहार जनशक्तीचे प्रमुख  बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे. जर सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडू दिला आहे.  

याचबरोबर, दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगांसदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, "आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे. जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढंच आमचं काम आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात, हे आम्हाला कळवलं सुद्धा जात नाही. अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आणि भांडून आम्ही ते करून घेतो. सरकारनं जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर निवडणुकीतून आम्ही दखल दाखवून देऊ. मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे." लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा जनतेचा आहे. पण लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा काहींना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो, अशी टीका बच्चू कडू यांनी रवी राणांवर केला आहे. बच्चू कडू म्हणाले, "काही आमदारांना असं वाटतंय की आपण खूप मेहनत केली, घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला. जनतेचा पैसा आहे, सरकारी पैसा हा सगळा आहे. लोकं कर भरतात, याचा विसर या लोकांना पडला आहे. यांना वाटतं आपल्या बाप दादांच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचा आहे. सरकार हे लोकांसाठी असतं आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा, तो राहणारच आहे." 

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरूनही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू म्हणाले, "तुम्ही लाडकी बहीण आणली १५०० रुपये देत आहे. दिव्यांगांचा महिना दीड हजार केला का? अडचणीत असणाऱ्यांसाठी तुमचे हात समोर येत नाहीत. लाडकी बहीण योजना चांगली आहे. पण तुम्ही दिव्यांगांना का बाजूला ठेवता ? अनाथांना, विधवा महिलांना का बाजूला ठेवता? त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणत नाही? विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पगार मिळेल, तेवढेच मिळणार, लाडकी बहिणीचा त्यांना फायदा होणार नाही."

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे