शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

“...तर विधानसभा लढवणार नाही, कोण म्हणाले की मी महायुतीत आहे?”; बच्चू कडूंचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 12:36 IST

Bacchu Kadu News: आमच्या मागण्या मान्य झाल्या, तर माझी जागा महायुतीला देईन, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Bacchu Kadu News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत पाहायला मिळत असली तरी राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा होऊ लागली आहे. काही घटक पक्ष दोन्ही आघाड्यांवर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत. यातच आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी एक मोठे विधान केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले. १९ जुलै रोजी महायुती सरकारला आमच्या मागण्याचे निवेदन देणार आहोत. सरकारने आमच्या मागण्या केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार असणार आहे. माझी जागा महायुतीला देणार आहे, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. 

बच्चू कडू यांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत

मी महायुती मध्ये नाही. कोणी सांगितले तुम्हाला मी महायुतीमध्ये आहे. आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी, ५० टक्के नफा धरून शेतकऱ्यांच्या शेतमालास भाव द्यावा, दिव्यांगांना दरमहिना मानधन द्यावे, गरीब व श्रीमंतामधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी, अशा काही मागण्यांचे निवेदन बच्चू कडू महायुती सरकारला देणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, छोट्या-मोठ्या पक्षांना किंवा संघटनांना संपवायचे मोठ्या पक्षांची पर्याय व्यवस्था तयार करून ठेवण्याची प्रवृत्ती आहे. छोट्या मोठ्या पक्षांची अशीच कुचंबणा होत असते. स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये होती, त्यावेळेला आमची परिस्थिती काय झाली. रस्त्यावरची लढाई छोटे पक्ष लढत असतात. तिसरी आघाडी बिघाडी आमच्या डोक्यात काही नाही छोट्या पक्षांचे आमदार वाढवणे हेच आमच्यासमोर सध्या उद्दिष्ट आहे. तिसरी आघाडी म्हणजे थोतांड आहे. विधानसभेला बच्चू कडू आणि मी एकत्रित येऊ शकतो राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूMahayutiमहायुती