शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 12:42 IST

Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर काल मुंबईत हल्ला झाला, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

Baba Siddique Shot Dead ( Marathi News ) : काल शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत भाष्य केले आहे. 

Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

"आता ही तरुण १०, २०, ५० हजार रुपयांसाठी हत्या करतात. यापाठिमागे खंडणी प्रकरण आहे. यामागे राजकारण अजिबात नाही. याच्यामागे काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार आहे. पोलिसांना यातले सर्व कळतंय.या प्रकरणात पोलिसांना पूर्णपणे फ्री हॅन्ड दिला पाहिजे. मी तुमच्या पाठिमागे आहे असं सांगायला पाहिजे. पण जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. पण ती फक्त गृहमंत्र्यांचीच नाही तर मुख्यमंत्र्‍यांचीही जबाबदार आहे, असं स्पष्ट मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. 

"योग्य अधिकारी कोण आहेत. हे पोलीस कमिशनर, डिजी यांना सगळं माहिती असतं. ते कोणाला घ्यायच नाही हे करतात पण, त्यांच्यावर जर आपण दबाव आणला तर ते कसं काम करणार?, असा सवालही छगन भुजबळ यांनी केला. 

मुंबई पोलिसांना केली विनंती

"वाय प्लस सुरक्षा द्या नाहीतर झेड प्लस सुरक्षा द्या. आता बाहेरच्या राज्यातील तरुण १०, ५० हजारात सुपऱ्या देतात आणि पिस्तुल देऊन यांना मारुन या म्हणून सांगतात. ती मुल जिवावर उदार होऊन हे करतात. वाय सुरक्षा असेल तर पोलिस पाठिमागील गाडीत बसलेली असतात. नेहमी व्हिआयपी लोक पुढच्या सीटवर बसलेली असतात, त्यांना गाडीतच गोळ्या झाडल्या आहेत. मुळात सुरक्षा द्यायला पाहिजे पण, मुळात या पाठिमागे कोण आहे हे पाहून नष्ट केले पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले. मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे, तुमच नाव खराब होत आहे. हे सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे, कोणत्याही दबावाला बळी न पडता यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhagan Bhujbalछगन भुजबळEknath Shindeएकनाथ शिंदे