शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 17:55 IST

Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी फेसबुक पोस्ट करुन हत्येची जबाबदारी घेतली होती.

Baba Siddique Shot Dead :  राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची रात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. एका तरुणाने फेसबुक पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली. ही पोस्ट अकोल्यातील शुभम लोणकर याने केल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी असलेल्या शुभम लोणकर याच्या ब्रीद्रुक या गावी पोलीस पोहोचले असता घराला कुलूप असलेले आढळून आले त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते.

या हत्येप्रकरणात फेसबुक पोस्ट लिहून जबाबदारी स्वीकारणाऱ्याचे नाव शुभम लोणकर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, फेसबुकवर तो शुब्बू लोणकर असे आपले नाव लिहित आहे. या दृष्टिकोनातूनही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधीही फेब्रुवारी २०२४ मध्ये शुभमवर अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप होता. अकोला पोलिसांनी त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."

शुभम लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावाही केला जात आहे. अकोला पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.याबाबत अजून कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. याप्रकरणी अकोट विभागाचे एसीपी अमोल मित्तल यांनी सांगितले की, त्याची फेसबुक पोस्ट समोर आल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे. रात्रीच आम्ही त्याच्या गावी जाऊन त्याच्या घराची झडती घेतली, मात्र फेसबुक पोस्ट त्याने की अन्य कोणी केली याबाबत सस्पेंस कायम असल्याचे त्यांनी सांगितले. असे असतानाही आम्ही या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहोत.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने याची जबाबदारी स्वीकारली

हत्येनंतर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये, टोळीने दावा केला आहे की त्यांना सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, परंतु बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे कारण त्याचे दाऊद इब्राहिमशी असलेले संबंध होते. पण या फेसबुक पोस्टबाबत मुंबई पोलिसांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी कार्यालयातून बाहेर पडून कारमध्ये बसले असताना तीन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामधील दोघांना पकडण्यात आले आहे, तर एक फरार आहे. सिद्दिकी इफ्तार पार्ट्यांसाठी ओळखले जात होते.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीPoliceपोलिसFacebookफेसबुक