शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 06:54 IST

सर्वोच्च न्यायालयाने फार्मसी महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया यंदा ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्याचे निर्देश फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)ला दिले होते.

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणारी बी. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहे. महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे. त्यामुळे फार्मसीची प्रवेश प्रक्रिया कधी पूर्ण होणार हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने फार्मसी महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया यंदा ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्याचे निर्देश फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)ला दिले होते. तसेच या महाविद्यालयांना मान्यता प्रक्रियेवर हरकती अथवा सूचना देण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्यानुसार यंदा ‘पीसीआय’ने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश विविध राज्य सरकारांच्या प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्राधिकरणांना दिले आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

परिणामी, ‘पीसीआय’ने मान्यता देऊनही आचारसंहितेमुळे राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होऊ शकत आहे.  ‘पीसीआय’ने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांचा समावेश प्रवेश प्रक्रियेत करावा लागणार असल्याने राज्य सरकारची अडचण झाली आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेलाच स्थगिती देण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे. 

सध्या दोन फेऱ्यांत २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश सद्य:स्थितीत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्यांमध्ये २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ४९७ महाविद्यालये सहभागी झाले असून, त्यांच्याकडे ४२ हजार २३३ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी ५० हजार ११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने या प्रवेशांना विलंब होणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षण