शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नगरची आयुषी खेडकर होणार ‘फायटर पायलट’, देशातील अकरा मुलींमध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:16 IST

Ayushi Khedkar : आयुषीचे प्राथमिक शिक्षण पाथर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले.

पाथर्डी (अहमदनगर) : आयुषी नितीन खेडकर हिने फायटर पायलट होण्याचा बहुमान पटकावत पाथर्डीचा झेंडा अटकेपार फडकविला आहे. देशभरातून निवडल्या गेलेल्या ६१ जणांमध्ये तिचा समावेश असून ती जिल्ह्यातील पहिलीच महिला फायटर पायलट ठरली आहे. यामध्ये ११ मुलींचा समावेश आहे. 

डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची आयुषी ही कन्या आहे. सध्या ती बेंगलोर येथे एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहे. ऑगस्ट २०२० मध्ये तिने फायटर पायलटची परीक्षा दिली. त्याचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. आयुषीचे प्राथमिक शिक्षण पाथर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले. नंतर बीटेक करण्यासाठी ती चेन्नई येथे गेली होती. याच काळात तिने गुवाहाटी येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. तिची एकाच वेळी नौसेना व वायू सेनेत निवड झाली.  येत्या १ सप्टेंबरला ती हैदराबाद येथे प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे. 

दर्डा, मुंडे यांच्याकडून कौतुकआयुषी हिच्या यशाबद्दल ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी तिचे कौतुक केले आहे. तिच्या यशाचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘हमारी छोरियां भी छोरोसे कम नहीं’, असे ट्वीट करत अभिनंदन केले. 

दररोज आठ- दहा तासांची मेहनत करिअरचे पर्याय माझ्यासमोर होते. बेंगलोर येथे नोकरी करीत असताना संरक्षण खात्यातील माझ्या काही मित्रांमुळे मला हे करिअर करावे वाटले. कर्नल गोखले यांची मला मदत झाली, असे आयुषी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली. आयुषीने अत्यंत मेहनत घेतली. नोकरी करताना रात्री दररोज आठ-दहा तास तिने अभ्यास करून ध्येय गाठले, असे तिच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर