शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रौप्य महोत्सवात पुरस्कारांचा चौकार

By admin | Updated: May 5, 2017 06:25 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ४४ शहरांनी सहभाग घेतला होता. यापैकी नवी मुंबईला देशातील ८ व्या

नामदेव मोरे / नवी मुंबई स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ४४ शहरांनी सहभाग घेतला होता. यापैकी नवी मुंबईला देशातील ८ व्या क्रमांकाचे स्वच्छ शहर असल्याचा बहुमान मिळाला. पहिल्या दहामध्ये सहभाग असलेले एकमेव शहर ठरले आहे. घनकचरा व्यवस्थापनाची सर्वात उत्तम यंत्रणा, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, कचरा उचलण्याचे योग्य नियोजन व कचऱ्यावर होणारी प्रक्रिया यामुळे २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये राज्य शासनाचे तीन पुरस्कार पालिकेने मिळविले असून, येथील स्वच्छतेवर आता थेट केंद्र शासनाची मोहर उमटली आहे. नवी मुंबईच्या शेजारी असणाऱ्या मुंबई, ठाणे, मीरा-भार्इंदर, कल्याण- डोंबिवली, पनवेल महापालिकांना घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात अपयश आले आहे. डंपिंग ग्राउंडसह वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने वारंवार आंदोलने केली जात आहेत. डंपिंग ग्राउंडमुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना नवी मुंबई महापालिकेमध्ये अद्याप कचरा उचलण्यावरून व कचऱ्याची विल्हेवाट करण्यावरून आंदोलन करण्याची वेळ आलेली नाही. महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने अत्याधुनिक डंपिंग ग्राउंड उभारण्यावर लक्ष केंद्रित केले. कोपरखैरणेमधील डंपिंग ग्राउंड बंद केल्यानंतर तेथे भव्य निसर्ग उद्यान उभारले आहे. यानंतर तुर्भेमध्ये डंपिंग ग्राउंड तयार केले असून सद्यस्थितीमध्ये देशातील सर्वात अत्याधुनिक डंपिंग ग्राउंड म्हणून त्याची ओळख आहे. देश-विदेशातील शिष्टमंडळ डंपिंग ग्राउंडची पाहणी करण्यासाठी शहरामध्ये येत आहेत. शहरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचा प्रयोग फसल्यानंतर महापालिकेने योग्य नियोजन केले असून सद्यस्थितीमध्ये शहरातील कचरा वेळेवर उचलला जात आहे. मुंबईसह ठाणे व इतर शहरांमध्ये सांडपाणी खाडीमध्ये सोडले जात आहे. फक्त नवी मुंबईमध्ये १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून त्यासाठी अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नवी मुंबई हे राज्यातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. राज्य शासनाने २००२ मध्ये सर्वप्रथम संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविले. हे अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे पहिल्याच वर्षी महापालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. २००५ - ०६ या वर्षामध्ये महापालिकेने पुन्हा नागरी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला. या अभियानामध्येही प्रथम क्रमांक मिळविला, याशिवाय २००८ - ०९ या वर्षामध्येही विशेष पुरस्कार मिळविला. या तीनही अभियानामध्ये पालिकेने १ कोटी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळविले. या बक्षिसामधून पालिकेने नेरूळमध्ये संत गाडगे महाराज उद्यान उभारले असून वंडर्स पार्कनंतर ते नवी मुंबईतील सर्वात प्रमुख उद्यान आहे. केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्येही देशातील ८ वा व राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवून पुन्हा एकदा नवी मुंबईत राज्यातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईला मिळालेले हे मानांकन खरोखरच कौतुकास्पद आहे. आता ही जबाबदारी संपलेली नसून हे मानांकन टिकवणे तसेच आणखी अव्वल स्थान गाठण्याचा ध्यास घेणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासून स्वच्छतेचे मूल्य रुजविणे आवश्यक असून नागरिक, प्रशासकीय व्यवस्थेने मिळून स्वच्छता राखणे गरजेचे आहे. - डॉ. सुभाष बोरसे, बोर्डाचे सहसचिवएक नवी मुंबईकर असल्याचा खूप अभिमान वाटतोय. प्रत्येक परिसरातील नागरिकाने स्वच्छतेची शपथ घेऊन शहर स्वच्छ कसे राखता येईल यादृष्टीने प्रयत्नशील राहिले पाहिजे. घराप्रमाणेच आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नवी मुंबई शहराची प्रगती झपाट्याने होत असली तरी सामाजिक मूल्यांचा विसर पडता कामा नये.- शीतल पाठक, अभिनेत्रीस्वच्छ भारत अभियानातंर्गत नवी मुंबई शहराला मिळालेले मानांकन ही नवी मुंबईकरांसाठी गर्वाची गोष्ट आहे. शहरातील बस डेपो, रेल्वे स्थानक तसेच महत्त्वाच्या परिसरात नागरिकांनी तसेच प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवित जनजागृतीपर उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनही अचूक पध्दतीने होणे आवश्यक आहे. - डॉ. विलासराव कदम, संचालक, भारती विद्यापीठ, नवी मुंबईमहापालिकेने केलेले काम अभियान काळात शहरात ६९ ठिकाणी सामुदायिक शौचालयांची उभारणीपामबीचसह ठाणे-बेलापूर रोडवर २० ई-टॉयलेटची उभारणीमहिलांसाठी अत्यावश्यक त्या ठिकाणी ६ स्मार्ट एसएचई शौचालयांची उभारणीअभियानादरम्यान झोपडपट्टीमध्ये वैयक्तिक शौचालयांची उभारणी गणेशोत्सव काळात ६५ टन निर्माल्य संकलित करून खतनिर्मिती२०१६ - १७ मध्ये १७० ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता मोहीमप्लास्टीकमुक्त नवी मुंबई अभियानसर्व १११ प्रभाग हागणदारीमुक्त घोषित शहरातील ११२ गृहनिर्माण संस्थांमध्ये कचऱ्यातून खतनिर्मिती१३५ मोठ्या हॉटेलना कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास भाग पाडले१३५०० कचराकुंड्या व ६०० कम्युनिटी बिन्समधून कचरा उचलण्यात आलाकचराकुंडीमुक्त नवी मुुंबई अभियानाअंतर्गत २०० ठिकाणच्या बिन्स बंद करण्यात आल्या. महापालिकेला मिळालेले पुरस्कार २००१ : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार २००२ - 0३ : संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान२००५ - 0६: संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान २००८ - 0९ : संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान२००८ : राष्ट्रीय नागरी जल पुरस्कार २००९ : २४ तास पाणीपुरवठ्यासाठी नागरी जल पुरस्कार २०१० : पाणीपुरवठ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार २०११ : ईपीसी वर्ल्ड अ‍ॅवॉर्ड२०१५ : ग्रीन बिल्डिंग अ‍ॅवॉर्ड२००९ : मिनीस्ट्री आॅफ अर्बन डेव्हलपमेंट अप्रीसिएशन अ‍ॅवॉर्ड२००९ : वसुंधरा पुरस्कार २०११ : विसीटेक्स ग्रीन अर्बन डेव्हलपमेंट अ‍ॅवॉर्ड२०१६ : गोल्ड अ‍ॅवॉर्ड२०१७ : स्वच्छ भारत अभियानामध्ये राज्यात प्रथम व देशात ८ वा क्रमांक