शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

सरपंचांना वाढीव मानधनाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 6, 2015 02:55 IST

वर्षभरापूर्वी शासनाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या मानधनात आणि सदस्यांच्या बैठक भत्त्यात मोठी वाढ केली.

राजेंद्र वाघ, शहाडवर्षभरापूर्वी शासनाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या मानधनात आणि सदस्यांच्या बैठक भत्त्यात मोठी वाढ केली. मात्र, आता वर्ष होऊनदेखील हे वाढीव मानधन व भत्ता या लोकप्रतिनिधींना मिळालेला नाही. एवढेच नव्हेतर आहे ते मानधन व भत्तासुद्धा वेळेवर मिळत नसल्याने शासन लोकप्रतिनिधींची थट्टा करीत आहे काय, असा सवाल सर्वत्र विचारला जात आहे.नव्या परिपत्रकानुसार सरपंचांना लोकसंख्येनुसार देण्यात येणाऱ्या मानधनासाठी राज्य शासन ७५ टक्के अनुदान देणार असून, उर्वरित २५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिली जाईल. याशिवाय, ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठक भत्त्यात तब्बल आठपटीने वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता आता २५ रुपयांवरून २०० रुपये एवढा झाला आहे. एरव्ही, मासिक बैठकांकडे पाठ फिरविणाऱ्या सरपंच आणि सदस्य यांचे मानधन व भत्ता वाढल्याने उपस्थिती वाढणार आहे. यातून ग्रामीण भागातील प्रश्नांवर चर्चा होऊन विकासकामांनासुद्धा वेग येईल, असे अपेक्षित आहे. मात्र, आता वर्ष होऊनदेखील सरपंचांना वाढीव मानधन आणि सदस्यांना बैठक भत्ता मिळालेला नाही. कल्याण तालुक्यात १२४ महसुली गावे, १५ आदिवासी पाडे, वस्त्या असून ४६ ग्रामपंचायती आहेत. तेव्हा, येथील ४६ सरपंचांना वाढीव मानधनाची व ४१२ ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्त्याची प्रतीक्षा आहे.ग्रामपंचायत सदस्याला एका वर्षात होणाऱ्या जास्तीतजास्त १२ बैठकांना हा वाढीव भत्ता मिळणार आहे. प्रतिबैठक २०० रुपये याप्रमाणे हा भत्ता मिळेल. १२पेक्षा अधिक बैठकांसाठी भत्ता मिळणार नाही. याबाबत, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी खबरदारी घ्यावी. खर्चापोटी शासन १०० टक्के अनुदान देणार आहे. मात्र, हे अनुदानसुद्धा शासन वेळेवर देत नाही. त्यामुळे बऱ्याचदा पदरमोड करून या लोकप्रतिनिधींना जनसेवा करावी लागते. त्यामुळे शासनाने किमान वेतन वाढीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.सध्या शासनाकडून आम्हाला अत्यंत तुटपुंजे मानधन मिळते. तेसुद्धा वेळेवर मिळत नाही. विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीची अशीच स्थिती असल्याने कामे वेळेवर करता येत नाहीत.- संतोष सुरोशी, सरपंच, रायताशासनाकडून सरपंचांचे वाढीव मानधन व सदस्यांचा बैठक भत्ता अदा करण्यासाठी अनुदान आले आहे का, याची माहिती घेतो. जर वाढीव बजेट आले असेल तर तत्काळ लोकप्रतिनिधींना त्यांचे मानधन व भत्ते दिले जातील. - प्र.आ. घोरपडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कल्याण