शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सरकारच्या गाईडलाईन्स; मास्क वापरण्याचं आवाहन

By नारायण जाधव | Updated: November 7, 2023 20:08 IST

सकाळ-संध्याकाळ दारे-खिडक्या बंद ठेवा

नवी मुंबई : राजधानी मुंबईसह राज्यातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांनी कठोर उपाययोजना योजण्यास सुरुवात केली आहे. यासह राज्याच्या आरोग्य खात्यानेही पुढाकार घेऊन नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

यात एन-९५ व एन ९९ मास्क, कापडी मास्क, रुमाल वापरण्यासह सकाळचा माॅर्निंग वाॅक, संध्याकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे, सकाळ-संध्याकाळ घराची दारे खिडक्या बंद ठेवा, असे आवाहन केले आहे. ज्येष्ठांसह गरोदर माता, लहान मुले, पोलिस, रिक्षाचालकांना धोका असून राज्यातील सध्याचे हवामान ज्येष्ठ नागरिक, पाच वर्षांखालील लहान मुले, गरोदर महिला, व्याधींनी त्रस्त व्यक्ती, वाहतूक पोलिस, सफाई कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले यांना हानिकारक असून, योग्य खबरदारी न घेतल्यास मृत्यू ओढवू शकतो, असे आरोग्य खात्याचे पुणे येथील संचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी बजावले आहे. याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

या आहेत सूचना१ - प्रदूषणापासून होणारे दुष्परिरणाम टाळण्यासाठी वाहतूक कोंडीची ठिकाणे, दगडखाणी, कोळशावर आधारित उद्योग, वीटभट्टी, उच्च प्रदूषण असलेले उद्योग, वीज प्रकल्प येथे जाणे टाळावे.२ - फटाके जाळणे टाळावे३ - सिगारेट, विडी आणि संबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे४ : बंद आवारात डासांच्या कॉईल जाळू नये५ - घरामध्ये झाडू मारण्याऐवजी व्हॅक्युक क्लिनरचा वापर करा६ - वाहत्या पाण्याने डोळे धुवा७ - उघड्यावर कचरा, गोवऱ्या जाळू नका८ - एअर प्युरिफायरचा वापर टाळा

स्थानिक स्वराज्य संस्थांना कृती आराखडामहिनानिहाय वायूप्रदूषणाची नोंद ठेवाअसुरक्षित लोकसंख्येची दस्तऐवजीकरण कराआरोग्य सेवा, पायाभूत सुविधांची यादी तयार ठेवाप्रदूषणाची हॉटस्पॉट तपशील आरोग्य सेवांचे नियोजन कराआरोग्य सेवा, आरोग्य कर्मचारी, साधनसामग्री यांची पूर्व तयारी करून ठेवा