शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांच्या व खासगी कंपन्यांच्या बसेसची मदत घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 21:14 IST

एसटी महामंडळातील संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये व विशेषत: उद्याच्या भाऊबीजेला नागरिकांना प्रवास करताना अडचणी येऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बैठक घेण्यात आली

ठाणे - एसटी महामंडळातील संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये व विशेषत: उद्याच्या भाऊबीजेला नागरिकांना प्रवास करताना अडचणी येऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बैठक घेण्यात आली असून, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी परिवहन महामंडळाचे अधिकारी, पोलीस यांना त्याप्रमाणे सुचना दिल्या आहेत. आठही एसटी बस डेपोत महानगरपालिका, खासगी कंपन्या यांच्याकडून प्रवासी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.याशिवाय सर्व खासगी बसेस, मालवाहू वाहने, शाळांच्या व कंपन्यांच्या बसेस तसेच केडीएमसी, एनएमएमटी,टीएमसी यांच्या बसेस पण उपलब्ध असतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. नवी मुंबई, वाडा, विठ्ठलवाडी, कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे खोपट, वंदना टाकीज, या सर्व ठिकाणी परिवहन अधिकारी, पोलीस, एसटी महामंडळ अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांची पथके नेमली असून, ही पथके प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतील.एनएनएमटीने ७ मार्गांवर १३४ फेऱ्या,ठाणे विभागात १८४ फेऱ्या, कल्याण डोंबिवली बदलापूर विभागात १५१ फेऱ्या, पनवेल विभागात ३०८ फेऱ्या, मुंबई विभागात २३३ फेर्यांचे नियोजन केले आहे. कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाने पनवेल, वाशी, बेलापूर, भिवंडी, मलंगगड, वाशी या मार्गांवर ५६ बसेस चालविण्याचे ठरविले असून ३०० फेर्यांचे नियोजन केले आहे. ठाणे पालिकने मीरा रोड,बोरीवली, नालासोपारा, नारपोली,काल्हेर अशा मार्गांवर ८१ बसेस चालविण्याचे ठरविले असून ३८६ फेऱ्या मारण्यात येतील. आनंदनगर आगारातूनही जादा १० बसेस धावतील.