नव्या मनोऱ्यात आमदारांच्या कार्यकर्त्यांची ‘अधिकृत’ सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 05:23 AM2019-07-07T05:23:18+5:302019-07-07T06:02:21+5:30

८५० कोटी रुपयांचा खर्च । प्रत्येक आमदारास मिळणार १,०३२ चौरस फुटांचा कक्ष

The 'authorized' facility of MLA workers in the new tower | नव्या मनोऱ्यात आमदारांच्या कार्यकर्त्यांची ‘अधिकृत’ सोय

नव्या मनोऱ्यात आमदारांच्या कार्यकर्त्यांची ‘अधिकृत’ सोय

Next

- यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनोरा आमदार निवासाची सध्याची इमारत पाडून त्या ठिकाणी ३४ मजल्यांचे दोन टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंतचे कार्यकर्ते आमदारांच्या खोल्यांवर नेहमीच गर्दी करतात आणि प्रसंगी आमदारांनाही आक्रसून वावरावे लागते. मात्र, आता तसे होणार नाही. कार्यकर्ते, पाहुणे आणि एकूणच अभ्यागतांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था नव्या मनोºयात करण्यात येणार आहे.


सध्याच्या मनोऱ्यामध्ये एकूण ३३६ कक्ष आहेत आणि प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ हे ३३२ चौरस फूट आहे. त्यातच आमदार स्वत:ची वेगळी खोली करून घेतात आणि समोरच्या खोलीत कार्यकर्ते, पाहुणे यांची वर्षभर गर्दी असते. समोरची खोली भरली की काही जणांना आपल्या खोलीत जागा दिल्याशिवाय आमदारांनाही पर्याय नसतो. आमदारांच्या अगदी जवळचे लोक त्यांच्या खोलीत आणि बाकीचे समोरच्या खोलीत असे वर्गीकरण बरेचदा केले जाते. त्यातून मानापमान नाट्येही रंगतात. कार्यकर्त्यांना अनेकदा दाटीवाटीने झोपावे लागते. ही गैरसोय आता टळणार आहे.


उपचारांसाठी नातेवाईक वा आप्तेष्टास घेऊन आलेले कार्यकर्ते, मुंबईत शिकायला आलेले विद्यार्थी, मुंबई बघण्यासाठी
आलेले गावाकडील कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंब अशा तºहेतºहेच्या लोकांनी आमदारांच्या खोल्या हाउसफुल्ल असतात. आता नवीन मनोरा आमदार निवासात प्रत्येक आमदारास तब्बल १ हजार ९० चौरस फुटांचा कक्ष मिळणार आहे. त्यातील ६८२ चौरस फूट जागा ही आमदारांसाठी असेल तर ४१८ चौरस फूट जागा ही अभ्यागतांसाठी राहील. एकूण ३७६ कक्ष असतील. सध्या १४ मजल्यांचे चार टॉवर आहेत.


नवे मनोरा आमदार निवास हे ८५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. उभारणीचे काम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन करणार आहे.

असे असेल नवे मनोरा
एकूण बांधकाम : ७.७२ लाख चौरस फूट
एकूण कक्ष संख्या : ३७६
वाहनतळ : ५८१ कारसाठी
सभागृह : आसन क्षमता २४०
क्षेत्रफळ : ४ हजार चौ. फूट
याशिवाय, दवाखाना, बँक, ९ दुकाने, ३ भोजनकक्ष, मध्यवर्ती वातानुकूलित व्यवस्था, एक जिमखाना, एक योगकक्ष, एक वाचनालय, एक छोटे थिएटर. २ कँटिन

Web Title: The 'authorized' facility of MLA workers in the new tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.