शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता! डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 05:24 IST

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव सांगता समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दादर येथे झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेब आणि दुसरा बाजीराव यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता, त्याला इतिहासकारांनी हिंदूद्वेष्टा ठरविले, असा दावा नेमाडे यांनी केला आहे.  

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव सांगता समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दादर येथे झाला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक वाजपेयी यांच्यासह डॉ. भालचंद्र नेमाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नेमाडे म्हणाले, पुस्तके वाचली की, तुम्हाला खरे काय ते कळेल. बाहेर चाललेले खोटे असते. 

शिवाजी महाराजांचा विश्वासू सहकारी मुसलमान होता. शेवटपर्यंत त्यांचा विश्वास असणारा सहकारी मदारी मेहेतर होता. औरंगजेबाचा सेनापती जयसिंह ज्याने शिवाजी महाराजांना पकडून दिले तो हिंदू होता. 

औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. निम्म्याहून जास्त हिंदू सरदार त्याच्या काळात वाढले; मग, तो हिंदूद्वेष्टा वगैरे होता, असे कसे म्हणता येईल? सतीप्रथा कुणी बंद केली हे विचारले की, उत्तर येते लॉर्ड बेटिंग. मात्र, सतीची प्रथा पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेबच होता, असेही नेमाडे यांनी सांगितले.

काय म्हणाले नेमाडे? औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या. शाहजहानची आई हिंदू होती, अकबराची बायको हिंदू होती, औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आले. म्हणून त्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदूद्वेष्टा ठरवले आहे. पण, औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता. 

भाजपची तक्रारभालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावर आता वादविवाद सुरू झाले आहेत. भाजपने नेमाडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती भाजप सोशल मीडियाचे कायदेशीर सल्लागार विभागाचे प्रमुख ॲड. आशुतोष दुबे यांनी ट्वीट करत दिली.