शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘या देशात औरंगजेब हिरो होऊ शकत नाही’; स्टेट्स ठेवल्याची एसआयटी चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:17 IST

भारतातला मुसलमान हा काही औरंगजेबाचा वंशज नाही. या देशात तो कोणाचा हिरो होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, कलामच हिरो होऊ शकतात, असे  फडणवीस यांनी ठणकावले.

मुंबई : औरंगजेबाचे स्टेटस ठेवून तरुणांची माथी भडकविण्याचे काम कोणीतरी करत आहे. यामागे षङ्यंत्र आहे का यावर एटीएस, आयबीदेखील काम करत आहे. आवश्यकता भासल्यास एसआयटी चौकशीदेखील करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.  यासंदर्भात भाजपचे नितेश राणे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की,  या देशात औरंगजेब हा कोणाचाच नेता होऊ शकत नाही. अगदी देशातील मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही. तो वंशाने टर्किक मंगोल होता. भारतातला मुसलमान हा काही औरंगजेबाचा वंशज नाही. या देशात तो कोणाचा हिरो होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, कलामच हिरो होऊ शकतात, असे  फडणवीस यांनी ठणकावले. राणे यांच्या काही विधानांवर सपाचे अबू आझमी आणि रईस शेख यांनी आक्षेप घेतला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. 

‘...मग आंबेडकरांविरुद्ध गुन्हा का नाही?’   ॲड. प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या मजारीवर गेले होते. स्टेट्स ठेवले म्हणून गुन्हे दाखल करता मग आंबेडकरांविरुद्ध गुन्हा का नाही, असा सवाल अबू आझमी यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवावे, असे आवाहन मी आंबेडकर यांनाही केले होते. जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणे खपवून घेणार नाही. महापुरुषांचा अवमानही सहन करणार नाही. अगदी माझा सख्खा भाऊ असला तरी कारवाई करेन.  

‘आता बाबा नावाचा पुरावा आणू का?’ उदात्तीकरण करू नये असे आपण म्हणालात पण संभाजी भिडेंचा उल्लेख गुरुजी म्हणून करत आहात. तो माणूस गुरुजी असल्याचा काही पुरावा आहे का? तो माणूस फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक होता, असे सांगतात. तो सोने गोळा करतो. त्याचा हिशेब घेतला का, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले, त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे. आता तुम्हाला ‘पृथ्वीराज बाबा’ म्हणतात. आता ‘बाबा’ नावाचा पुरावा आणू का?

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा