शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : मुख्य आरोपीला VIP ट्रिटमेंट दिल्याचा पोलिसांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 10:10 IST

बुधवारी लच्छू पहिलवानला अटक केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पोलिसांचं लच्छू पहिलवानाबरोबरचं वागणं बदलल्याचा आरोप केला जातो आहे.

औरंगाबाद-  ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. बुधवारी लच्छू पहिलवानला अटक केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पोलिसांचं लच्छू पहिलवानाबरोबरचं वागणं बदलल्याचा आरोप केला जातो आहे. औरंगाबाद हिंसाचारात मुख्य आरोपी असलेल्या लच्छू पहिलवानाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जात असल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. लच्छू पहिलवानाशी पोलीस काहीतरी खाजगीत बोलत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलीस व लच्छू पहिलवान या दोघांची मिलिभगत असल्याचा आरोप केला जातो आहे. 

औरंगाबादमधील हिंसाचार भडकाविल्याचा आरोपही पोलिसांवर केला जातो आहे. दोन गटांकडून जाळपोळ सुरू असताना त्यामध्ये पोलिसांचाही सहभाग होता, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला होता. जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ सुरू असताना त्यांच्यासोबत 10 पोलीस चालत होते, असं नऊ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीमधून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जमाव वाहनं पेटवून देत असताना पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. 

औरंगाबादमध्ये हिंसाचार भडकाविण्यात लच्छू पहिलवानाचा मोठा वाट आहे. लच्छू या दंगलीचा मुख्य सूत्रधार आहे. लच्छू पहिलवान दंगलीत सक्रिय होता, असा संशय पोलिसांना होता. चार दिवसांपासून एसआयटी त्याच्याविरोधात पुरावे गोळा करीत होते. दोन दिवसांपासून मात्र तो पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना बुधवारी रात्री तो दिवाणदेवडी येथील त्याच्या एका मित्राच्या घरी येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिली. आयुक्तांच्या आदेशाने एसआयटीतील पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, कर्मचारी मनोज उईके, दादासाहेब झारगड, सचिन संकपाळ, विनोद खरात आणि योगेश तळवंदे यांच्या पथकाने सापळा रचला. तो तेथे येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लच्छूला चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले. त्याला दंगल करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabadऔरंगाबाद