शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

औरंगाबाद पर्यटनसमृद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 01:19 IST

पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली

मुंबई : पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या औरंगाबादमध्येआयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधानसचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या, ‘अजिंठा-वेरूळ’च्या लेण्यांकडे पर्यटकांचा नेहमीच मोठा ओघ राहिला आहे. राज्यात येणाऱ्या देशी, तसेच परदेशी पर्यटकांना या स्थळांनी नेहमीच आकर्षित केले आहे. ऐतिहासिक रेशीम मार्ग आणिचीनसह जगभरातल्या बुद्धिस्ट वर्तुळाशी असलेला संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पद्मपाणिची (बुद्ध) भलीमोठी शिल्पे असल्याने अजिंठाचा समावेश नेहमीच जगातल्या अप्रतिम पर्यटन स्थळांमध्ये होतो. त्यामुळे या परिषदेसाठी औरंगाबादची निवड करण्यासाठी ही कारणे पुरेशी आहेत. या परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद आणि राज्यातील इतर पर्यटनस्थळांचा पुरस्कार होईल.या परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, यासाठी पर्यटनखाते प्रयत्नात आहे. पहिल्या दिवशी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या सार्क देशांचे अधिकारी (साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोआॅपरेशन) या परिषदेला हजेरी लावणार आहेत. दुसऱ्या दिवशी या देशांचे पर्यटनमंत्री, तसेच भारतीय राज्यातले मंत्री सहभागी होतील.अजिंठा आणि शहरातल्या इतर पर्यटनस्थळांकडे परदेशी, तसेच देशी पर्यटकांचा ओघ वाढावा, यासाठी २०१८ मध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गोल्फ टुरिझमबरोबरच शहरात फूड फेस्टिवल आणि हँडीक्राफ्ट फेस्टिव्हल भरवण्यासही मोठा वाव आहे. वेरूळ इथे एमटीडीसीच्या ९०० एकर जागेवर बुद्धिस्ट सेंटर बांधण्यावर विचार चालू आहे. (प्रतिनिधी)२०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’पर्यटन क्षेत्राच्या वाढ आणि विकासासाठी पुढील दोन वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे केले जाईल आणि २०१८ हे वर्ष जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने अजिंठा लेणी शोधल्याला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरे केले जाईल. महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांची महती जगभरात पसरावी, यासाठी एक कॅम्पेन सुरू करण्यात येईल. ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’अंतर्गत या कॅम्पेनचे प्रमोशन केले जाईल. टुरिझम स्टार्टअपसाठी आर्थिक सहाय्यस्टार्ट-अप योजनेंतर्गत पर्यटन व्यवसायामध्ये नवा सेटअप उभारू इच्छिणाऱ्यांना ५० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आॅक्टोबरमध्ये ‘अजिंठा-वेरूळ महोत्सव’- १४ ते १६ आॅक्टोबरदरम्यान एमटीडीसीच्या सहकार्याने तीन दिवसांचा अजिंठा-वेरूळ महोत्सव भरवला जाणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेला शहरातल्या सर्व पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या सिटी टूर बसची योजना करण्याची सूचना केली आहे. मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादबरोबरच औरंगाबादची जयपूर, उदयपूर, नागपूर आणि पुणे या शहरांशी असलेली एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.