शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा आज नव्याने निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 06:54 IST

बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते  बेकायदा होते - फडणवीस

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय अवैध असल्याचे सांगत आता शनिवारी (दि.१६) मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचे हे दोन्ही निर्णय नव्याने घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. नवी मुंबई विमानतळास ज्येष्ठ नेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही उद्या घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते  बेकायदा होते. ते उद्या न्यायालयात गेले तर टिकणार नाहीत. ही नामांतरे आमच्याही अस्मितेचाच भाग असल्याने आमचे पूर्ण बहुमतातील सरकार योग्य प्रक्रियेने हा निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमदार अब्दुल सत्तार यांनी रवींद्र नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात शुक्रवारी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिंदे यांनी टीका केली की, अडीच वर्षे सरकारने या नामांतराबाबत कोणतेही निर्णय घेतले नाहीत अन् जाताजाता अवैधरीत्या निर्णय घेतले. 

फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेल्या सरकारने घेतलेले निर्णय बेकायदा ठरतात आणि न्यायालयांचे आधीचे अशा प्रकरणांबाबत निकालही आहेत. आता सुधारित प्रस्ताव तयार करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना सांगितले आहे. आमचे पूर्ण बहुमत असलेले सरकार हा निर्णय घेईल. 

...तर कायमचे राजकारण सोडेन आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकही आमदार पडला तर आपण राजकारण सोडू. आपण शिवसेनेच्या हितासाठी उठावाची जी भूमिका घेतली ती लोकांनी स्वीकारली आहे. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद