शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘गुगल’वर औरंगाबादचे झाले संभाजीनगर....; आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही घेतली नामांतराची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 06:08 IST

गुगलने औरंगाबादप्रमाणेच उस्मानाबाद शहराचेही धाराशिव असे नाव अपडेट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क       औरंगाबाद : इंटरनेटचे आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’वर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मागील २५ दिवसांत दोन वेळा शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर नामांतराचा पहिला प्रस्ताव रद्द करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरा प्रस्ताव मंजूर केला. केंद्र शासनाने  औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसली तरी गुगल सर्च इंजिनसह मॅपवर संभाजीनगर असे नाव दिसते आहे.  

सरकारच्या निर्णयाची दखल क्रोमा या कंपनीने घेत त्यांच्या लोकेशनवर संभाजीनगर केले आहे. तर शहरातील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनीदेखील ‘संभाजीनगर’ असे लिहिण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून वादाचे वातावरण असताना गुगल मॅपवर औरंगाबादचे नाव बदलले आहे. गुगलवर औरंगाबाद  टाकल्यावर तिथे औरंगाबादच्या खाली संभाजीनगर असे  दिसते आहे. यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.    

खा. जलील यांचा गुगलला सवाल 

खा. इम्तियाज जलील यांनी गुगल व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे सर्च केल्यावर दिसते आहे. हे नाव कशाच्या आधारे बदलले, असा सवाल त्यांनी ट्वीट करून विचारला आहे.

या कंपनीच्या पत्त्यावरही नाव बदलले 

‘क्रोमा’ ही टाटा समूहाची उपकंपनी आहे. या कंपनीच्या लोकेशनमध्ये आता ‘औरंगाबाद’ नव्हेतर, ‘संभाजीनगर’ असे लिहून येत आहे. क्रोमा ब्राऊझरच्या पोर्टलवर गेल्यावर लोकेशनसाठी ४३१००१ ते १० पर्यंत पिन कोड टाकल्यावर संभाजीनगर दिसून येत आहे.    

उस्मानाबाद सर्च केल्यास दिसते ‘धाराशिव’ 

उस्मानाबाद : गुगलने औरंगाबादप्रमाणेच उस्मानाबाद शहराचेही धाराशिव असे नाव अपडेट केले आहे. मॅप, वेदरमध्ये उस्मानाबाद सर्च केल्यानंतर आता उस्मानाबादसोबतच धाराशिव हे नावही दिसू लागले आहे. निजामाचा शेवटचा राजा मीर उस्मानच्या नावावरून उस्मानाबाद शहराचे नामकरण झाले होते. तत्पूर्वी या शहराचे नाव धाराशिव होते, हे जुन्या अभिलेखांवरून स्पष्ट झाले आहे. हैदराबाद स्टेटच्या गॅझेटमध्ये धाराशिव असा उल्लेख आहे. सोबतच जुन्या गाव नकाशा नोंदीवरही कसबे धाराशिव अशी नोंद आढळून येते. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद