शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आॅगस्ट क्रांती दिनी ‘बस देखो-रेल देखो’

By admin | Updated: June 30, 2014 00:44 IST

स्वतंत्र विदर्भासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. आंदोलनांतर्गत येत्या आॅगस्ट क्रांती दिनी ९ आॅगस्ट रोजी विदर्भात सर्वत्र ‘बस देखो रेल देखो’ हे आगळेवेगळे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

‘जनमंच’चा पुढाकार : विदर्भवाद्यांचे अभिनव आंदोलननागपूर : स्वतंत्र विदर्भासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. आंदोलनांतर्गत येत्या आॅगस्ट क्रांती दिनी ९ आॅगस्ट रोजी विदर्भात सर्वत्र ‘बस देखो रेल देखो’ हे आगळेवेगळे आंदोलन पुकारण्यात आले आहे. विदर्भवाद्यांच्या विदर्भस्तरीय प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विदर्भ राज्याच्या आंदोलनात सर्वसामान्यांचा सहभाग वाढवून त्याला व्यापक करण्याच्या दृष्टीने एक ठोस कार्यक्रम ठरविण्यासाठी ‘जनमंच’ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने रविवारी संघी सदन काँग्रेसनगर धंतोली येथे विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या विदर्भवादी प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकात वानखडे, प्रा. शरद पाटील, विदर्भ कनेक्टचे अ‍ॅड. मुकेश समर्थ, दिनेश नायडू, विष्णू मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, हरीश इथापे, अजय संघी, विशाल मुत्तेमवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची भूमिका विषद करताना चंद्रकांत वानखेडे यांनी स्वतंत्र विदर्भाचा लढा तीव्र करणे गरजेचे झाले असल्याचे स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, असा निर्धार करण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी येत्या ९ आॅगस्ट रोजी उपरोक्त आंदोलनाची घोषणा केली. ‘बस देखो, रेल देखो’ हे एक आगळेवेगळे आंदोलन राहणार आहे. या आंदोलनात आंदोलनकर्ते कुठल्याही कायद्याचे उल्लंघन करणार नाही. बसगाड्या रोखणे, रेल्वे रोखणे असा कुठलाही प्रकार होणार नाही. कुठलीही अनुचित कृती न करता केवळ बस स्थानक व रेल्वे स्थानकांवर बस व रेल्वे पाहण्यासाठी लोकांना गोळा करायचे आहे. विदर्भातील प्रत्येक ठिकाणी रेल्वे स्टेशन व बस स्थानकांवर विदर्भवादी मोठ्या संख्येने एकत्र येतील. स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देतील. तसेच भजन, कीर्तन, संगीत या माध्यमातून विदर्भाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतील. या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणून विदर्भवाद्यांनी सरकारला आपली शक्ती दाखवून द्यायची असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी साहित्यिकांची भूमिका मांडतांना विदर्भाच्या आंदोलनात त्यांनाही सामावून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. हरीश इथापे यांनी विदर्भाच्या आंदोलनात युवकांनी उडी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यासोबत अनेक प्रतिनिधींनी विदर्भातील मागासलेपणावर व विविध समस्यांवर प्रकाश टाकला. बैठकीत अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रवीण महाजन, प्रमोद पांडे, विजय विलोकर, गजानन अहमदाबादकर, राम आखरे, राजा आकाश, गजानन कोल्हे, नितीन कारेमोरे, प्रणय पराते, कृष्णराव दाभोळकर, सुनील वंजारी, पंकज वंजारी, प्रकाश इटणकर, संपत रामटेके, नरेश क्षीरसागर, किशोर गुल्हाणे उपस्थित होते.(प्रतिनिधी)