मुंबई : शंभर कोटींच्या विकासनिधी वाटपाबाबत महापौर स्नेहल आंबेकर यांच्याशी झालेली वादग्रस्त आॅडिओ क्लिप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात आज एकच खळबळ उडाली आहे. अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या वॉर्डातील विकासकामांसाठी राखीव निधी वाटपाचा महापौरांना अधिकार असतो़ मात्र ठेकेदारांच्या संगनमताने व नगरसेवकांकडून टक्केवारी घेऊन महापौरांनी निधीचे वाटप केल्याचा आरोप मनसेने केला होता़ महापौरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यानंतर देशपांडे यांनी यावर महापौरांबरोबर झालेल्या संभाषणाची आॅडिओ क्लीप आज जाहीर केली. यावरून विरोधकांनी सेनेला धारेवर धरले़ लाच प्रकरणी अटक झाल्यावर कोल्हापूरच्या महापौरांचा पक्षाने राजीनामा घेतला़ मुंबईच्या महापौरांनाही विकास निधी वाटपाचा बाजार मांडला आहे़ त्यामुळे आंबेकर यांच्याकडून राजीनामा घेऊन त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेकडे केली आहे़ (प्रतिनिधी)
आॅडिओ क्लिपचा महापौरांना ताप!
By admin | Updated: March 31, 2015 04:26 IST