शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...त्यापेक्षा बैठकच सोडून जातो ना; मंत्री सावेंच्या पवित्र्याने अजित पवार अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 09:21 IST

मंत्रालयात चार दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा आहे.

मुंबई : निधीची अडचण असेल आणि निर्णयही होणार नसतील तर मग मी बैठकच सोडून जातो ना! असा पवित्रा बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समक्ष मंत्रालयातील बैठकीत घेतला. शेवटी अजितदादांनी त्यांना समजावत विषय मार्गी लावण्याचा शब्द दिला. 

मंत्रालयात चार दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा आहे. ओबीसी कल्याण विभागाच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलविली होती. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सावे यांनी त्यांच्या विभागातील प्रलंबित प्रश्न मांडले आणि त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे, तेही बैठकीत सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतके प्रश्न सोडवायचे तर तरतूद किती आहे, आता लगेच तरतूद करण्यात कुठल्या अडचणी आहेत याकडे अजित पवार यांनी सावे यांचे लक्ष वेधले. 

माझ्या विभागाच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे आंदोलने होतात आणि मला उत्तरे देत बसावे लागते, असा सूर सावे यांनी लावला. त्यावर अजित पवार यांनी सांगितले की, ओबीसींचे प्रश्न तातडीने सोडविण्याचीच माझी भूमिका असते. बैठक सोडून जाण्याची गरज नाही, विषय मार्गी लावू. त्यानंतर सावे यांच्या आठही मागण्या मान्य केल्या. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये धनगर विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या दुप्पट करणे,  आदींचा त्यामध्ये समावेश आहे.

त्या अधिकाऱ्याला सावेंनी सुनावलेवित्त विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास मंत्री सावे यांनी चांगलेच सुनावले. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणे शक्य नसेल तर त्यांना दरमहा काही रक्कम दिली जाते. अशीच सवलत ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्याचा मुद्दा सावे यांनी मांडला. त्यावर, अन्य विभागांशी अशी तुलना करता येणार नाही, असा आक्षेप त्या अधिकाऱ्याने घेतल्यावर सावे यांनी त्याला फैलावर घेतले. 

टॅग्स :Atul Saaveअतुल सावेAjit Pawarअजित पवार