शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सायकल हब म्हणून नवी ओळख निर्माण करणार्‍या नाशिकमध्ये ‘सायकल कंदील’ ठरतोय आकर्षण

By azhar.sheikh | Updated: October 19, 2017 15:43 IST

एकूण धार्मिक-पौराणिक पर्यटनाकडून निसर्ग पर्यटनाकडे आणि तेथून वाईन टुरिझमकडे प्रवास करणारे 'गुलशनाबाद' अर्थात नाशिक आता सायकल हब म्हणून आपली नवी ओळख देशाच्या नकाशावर निर्माण करू पाहत आहे.

ठळक मुद्दे ‘सायकल कंदील’सोबत सेल्फी क्लिक करताना दिसून येत आहेत.नाशिकमधील कृषीनगर भागात सायकल सर्कल’ही नागरिकांचे लक्षवेधून घेत आहे नाशिकच्या अल्हाददायक वातावरण, जिल्ह्यातील धरणे, घाटमार्ग अशा भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेत सायकल चळवळ वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न गुलशनाबाद अर्थात नाशिक आता सायकल हब म्हणून आपली नवी ओळख देशाच्या नकाशावर निर्माण करू पाहत आहे

नाशिक : नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक पौराणिक धार्मिक वारसा लाभलेले शहर म्हणून जगभर प्रसिध्द आहे. दर बारा वर्षांनी येथील दक्षिण गंगा अर्थात गोदावरीच्या तीरावर भरणारा कुंभमेळा यामुळे हे शहर जगबर लोकप्रिय आहे. या शहराला प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणूनही ओळखले जाते. उत्तम असे पोषक- निरामय वातावरण लाभलेल्या या शहरात धार्मिक, दुर्ग, निसर्ग, धरण, पर्यटनासाठी देशभरातून नव्हे तर परदेशातूनही पर्यटक वर्षभर हजेरी लावतात. या शहराने काळानुरूप कात टाकली असून जागतिक स्तरावरील ‘रॅम’मध्ये भारताचा झेंडा मानाने पहिल्यांदा फडकाविणारे सायकलपटू डॉ. महाजन बंधू नाशिकचेच. त्यानंतर चालू वर्षी लेफ्टनंट कर्नल डॉ. श्रीनिवास गोकूलनाथ यांनी ही ‘रॅम’ जींकली. एकूण धार्मिक-पौराणिक पर्यटनाकडून निसर्ग पर्यटनाकडे आणि तेथून वाईन टुरिझमकडे प्रवास करणारे 'गुलशनाबाद' अर्थात नाशिक आता सायकल हब म्हणून आपली नवी ओळख देशाच्या नकाशावर निर्माण करू पाहत आहे.नाशिकमध्ये सायकलिंगचे ब्रॅन्डिंग व त्याची क्रेझ अबालवृध्दांमध्ये कमालीची वाढत आहे. यासाठी शहरातील काही सायकलपटूंनी एकत्र येत ‘नााशिक सायकलिस्ट फाउण्डेशन’ ही संघटना स्थापन केली आहे. या संस्थेने नवोदित सायकलपटू घडविण्याच्या दृष्टिकोनातून चांगले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. एकूणच नाशिक-पंढरपूर वारी, नाशिक-वणी, नाशिक-इगतपूरी अशा विविध सायकलिंगच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. महात्मा गांधी जयंती ‘सायकल डे’ म्हणून घोषित व्हावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून ही संस्था नाशिक-त्र्यंबकेश्वर नाशिक-मुंबई सायकल वारी गांधी जयंतीला करते. या संस्थेने नाशिकच्या अल्हाददायक वातावरण, जिल्ह्यातील धरणे, घाटमार्ग अशा भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेत सायकल चळवळ वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. नाशिकमधील कृषीनगर भागात सायकल सर्कल’ही नागरिकांचे लक्षवेधून घेत आहे. या संस्थेच्या वतीने सार्वजनिक सण-उत्सवामध्ये सायकलचे ब्रॅन्डिंग आणि सायकल चळवळ पुढे नेण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या लढविल्या जातात. कधी सायकलच्या स्पेअर्स पार्टद्वारे साकारलेला ‘सायकल गणेश’ तर या वर्षी चक्क सायकलच आकाशात लटकवून दिवाळीच्या निमित्ताने ‘सायकल कंदील’ उभारून दिपोत्सवाच्या संस्थेने नाशिककरांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तरण तलाव सिग्नल येथे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला लागून एका मोठ्या हायड्रोलिक क्रेनच्या साहाय्याने अस्सल पारंपरिक मॉडेलची सायकल लटकवून ‘सायकल कंदिल’ लावण्यात आला आहे. यावर सस्थेचा लोगो असून दिपावलीचा शुभेच्छा संदेशही लिहिण्यात आला आहे. सध्या आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा ‘सायकल कंदिल’ शहरात चर्चेचा विषय ठरला असून अनेक तरूण-तरुणी या ठिकाणी येऊन या आगळ्या वेगळ्या ‘सायकल कंदील’सोबत सेल्फी क्लिक करताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन