शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बहुरंगीसह सतरा लढतींकडे सोलापूर शहरवासीयांचे लक्ष

By admin | Updated: February 18, 2017 13:21 IST

बहुरंगीसह सतरा लढतींकडे सोलापूर शहरवासीयांचे लक्ष

बहुरंगीसह सतरा लढतींकडे सोलापूर शहरवासीयांचे लक्षसोलापूर: विधानसभा निवडणुकीची प्राथमिक चाचणी समजल्या जाणाऱ्या सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये २६ प्रभागात तुल्यबळ लढती आहेत़ बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत; मात्र १७ ठिकाणी ‘व्हीआयपी’ उमेदवार असल्यामुळे या लढतींची विशेष उत्सुकता लागली आहे़पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुलगा डॉ़ किरण यांना शेळगी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग दोनमध्ये उभे केले असून या ठिकाणी काँग्रेसचे केदार उंबरजे यांच्याबरोबर त्यांचा सामना होत आहे़ विद्यमान नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी यांचा पत्ता कट करून डॉ़ किरण यांना उमेदवारी दिली़ त्यामुळे हार-जीत कोणाची, याकडे शहराचे लक्ष लागले आहे़ प्रभाग सातमध्ये पारंपरिक विरोधकांमध्ये तुल्यबळ लढती आहेत़ या ठिकाणी माजी उपमहापौर राष्ट्रवादीचे नाना काळे हे सेनेचे अमोल शिंदे यांच्या विरोधात तर राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या विरोधात सेनेचे देवेंद्र कोठे आणि भाजपकडून श्रीकांत घाडगे लढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पॅनल टू पॅनल कोणाचा लागणार यावर पैजा लागल्या आहेत़ काँग्रेसने या ठिकाणी नवे चेहरे दिले आहेत़ महापौर सुशीला आबुटे यांच्या विरोधात भाजपच्या संगीता जाधव उभ्या राहिल्या असल्यामुळे या प्रभाग २४ च्या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीचे हारुन शेख आणि एमआयएमचे तौफिक शेख तसेच काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले आणि भाजपच्या मोहिनी पतकी यांची प्रभाग २१ मधील लढत देखील लक्षवेधी ठरली आहे़ प्रभाग सहामधून दिलीप कोल्हे यांना सेनेचे युवा नेते गणेश वानकर यांनी आव्हान दिले आहे़ प्रभाग १४ मध्ये काँग्रेसचे पॅनल तगडे असले तरी माजी महापौर आरिफ शेख यांनी बंडखोरी करून भाजपकडून तिकीट मिळविले. त्यामुळे या ठिकाणी नक्की काय होणार, याची उत्सुकता लागली आहे़विडी घरकूल परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग १० मध्ये प्रथमेश कोठे तर ११ मध्ये त्यांचे वडील महेश कोठे उभे आहेत़ या ठिकाणी प्रथमेशच्या विरोधात भाजपचे रवी नादरगी उभे आहेत तर महेश कोठेंच्या विरोधात बसवराज बिराजदार लढत देत आहेत़ प्रभाग १२ मध्ये सेनेचे विनायक कोंड्याल यांचा सामना राष्ट्रवादीचे माजी महापौर राजेंद्र कलंत्री यांच्याशी होत आहे़ सेनेकडून तिकीट कट झालेल्या महिला सेना आघाडीच्या प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी बंडखोरी करून सेनेच्या विरोधात उमेदवारी ठेवली आहे़ भाजपच्या देवी झाडबुके, सेनेच्या नम्रता निंबाळकर आणि काँग्रेसच्या संजीवनी कुलकर्णी यांच्याशी त्यांचा सामना आहे़प्रभाग पाचमध्ये बसपाचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे मनोज गादेकर, सेनेचे विष्णू निकंबे, भाजपचे बिज्जू प्रधाने, काँग्रेसचे कुणाल बाबरे आदींची लढत देखील चर्चेचा विषय बनली आहे़ कामगार नेते म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेले माजी आमदार आडम मास्तर यांनी पत्नी कामिनी आडम यांना प्रभाग १३ मधून उभे केले आहे़ इथे काँग्रेसच्या राधा होमकर आणि सेनेच्या शिवम्मा बंदपट्टे उभ्या आहेत़ आडम मास्तर यांची कन्या अरुणा आडम-गेंट्याल या देखील उभ्या असल्यामुळे आडम मास्तरातील घराणेशाही आता राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसते़ नातेवाईकांचा प्राधान्य४ज्यांनी आजवर कोणत्याही व्यासपीठावर राजकीय अस्तित्व दाखविले नाही अशा अनेक नेत्यांनी आपल्या मुलास, पत्नीला निवडणूक रिंगणात उभे केले आहे़ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुलाला उभे केले तर कामगार नेते आडम मास्तर यांनी आपल्या पत्नीला आणि मुलीला उमेदवारी दिली़ महेश कोठे यांनी आपल्या मुलाला तसेच पुतण्यास, बहिणीस उमेदवारी दिली आहे़ माजी खासदार कै. लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव नागेश, माजी आमदार शिवशरण पाटील यांनी अमरजीत तसेच भावजय यांना भाजप तिकीट मिळविले आहे़ माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचा मुलगा मनोज देखील नशीब अजमावित आहे़ महिला आरक्षण निघाल्यामुळे अनेकांनी आपल्या घरातील उमेदवार दिला आहे़