शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रीय सुरक्षेचा मंत्र’ उच्चारून भारद्वाज यांना अडकविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:02 IST

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी बचावपक्षाचा युक्तिवाद

मुंबई : पुणे पोलीस ‘राष्ट्रीय सुरक्षेचा मंत्र’ उच्चारून सुधा भारद्वाज यांना शहरी नक्षलवाद प्रकरणी अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक पाहता, सुधा भारद्वाज एल्गार परिषदेला उपस्थित नव्हत्या, असा युक्तिवाद सुधा भारद्वाज यांचे वकील युग चौधरी यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी केला.

अरुण फरेरा, वेर्नोन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. सारंह कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती.सुधा भारद्वाज यांच्याविरुद्ध पोलिसांकडे थेट पुरावे नाहीत. त्यांच्या घरातून लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, मोबाइल जप्त करण्यात आला. मात्र, त्यामध्ये गुन्ह्यासंबंधी काहीही पुरावे नाहीत. एका सहआरोपीच्या संगणकात असलेल्या सुधा भारद्वाज यांची सही नसलेले पत्र आढळले. त्या पत्रावरून पोलिसांनी सुधा भारद्वाज यांना अटक केली, तसेच भारद्वाज २ जानेवारी, २०१८ रोजी नागपूर येथे महिला कॉम्रेडच्या बैठकीला उपस्थित असल्याचा आरोप पोलिसांनी केला. मात्र, कॉल डाटा रेकॉर्ड तपासल्यावर असे निष्पन्न झाले की, बैठक आयोजित केलेल्या शोमा सेन १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होत्या, तर भारद्वाज या काळात फरिदाबाद येथे होत्या. तेथे त्या एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, असा युक्तिवाद चौधरी यांनी केला.

३१ डिसेंबर, २०१७ रोजी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या परिषदेमध्ये चिथावणीखोर भाषणे दिल्याने दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला.पुरावे नसताना अटक‘भारद्वाज यांच्याविरुद्ध काहीही पुरावे नसताना त्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मंत्र मोठमोठ्याने उच्चारला तर न्यायाधीश विचार न करताच पुराव्यांवर रबरी स्टॅम्प मारतील असे पोलिसांना वाटते,’ असे चौधरी यांनी म्हटले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार