शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून देशाचा सांप्रदायिक विभागणीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:16 IST

मीरा बोरवणकर यांच्याशी ‘लोकमत’चा संवाद; निवडणूक आयोगाची स्वायत्तता धोक्यात

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावर देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी सैन्यदल आणि शहीद जवानांचा वापर करणे गैर आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही जुमल्यांना बळी न पडता विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवृत्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी केले आहे.

बोरवणकर यांच्यासह ६६ माजी सनदी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना संयुक्तपणे पत्र लिहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर मीरा बोरवणकर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी मनमोकळेपणे आपली भूमिका स्पष्ट केली.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचे कारण काय?आम्ही सर्वांनी देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत दीर्घकाळ काम केले आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये केंद्र सरकारकडून आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, सर्व आयुक्तांनी त्या दबावाला न जुमानता स्वतंत्र आणि निपक्ष पद्धतीने काम पार पाडले आहे. यावेळी प्रथमच विपरित घडत आहे. गंभीर बाबीविरोधात आयोगाकडून ठोस भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र, आयोग दबावाखाली त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याविरुद्ध आवाज उठविणे आवश्यक होते. त्यासाठी आम्ही राष्टÑपतींकडे भूमिका मांडली आहे. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात, त्यासाठी आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांतर्गत दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करण्याची मागणी आहे.

राजकीय पक्षाकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर, पोलिसांवर दबाव असतो का?प्रत्येक राजकीय पक्ष पोलिसांवर दबाव आणण्याचा आणि आपल्याला सोयीचा निर्णय होण्याच्या प्रयत्नात असतो. अशावेळी सर्र्वाेच्च न्यायालयाने दिलेले निर्देश पोलिसांची स्वायत्तता सुरक्षित ठेवू शकतो.

मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीकडे आपण कसे बघता?सरकारकडून सांप्रदायिक मुद्द्यावर देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचप्रमाणे, नोटाबंदी हा सर्वात दुर्दैवी निर्णय होता. देशात व महाराष्टÑात पूर्ण बहुमत असतानाही भ्रष्टाचार रोखण्यास ते पूर्ण अपयशी ठरले आहे. शेजारी राष्टांशी संबंध सामान्य करण्याऐवजी बलाढ्य सैन्य दलाचा वापर करण्याची पद्धत निषेधार्ह आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी