शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

औरंगाबादच्या खुलताबादमध्ये एटीएसकडून डॉक्टर ताब्यात; दहशतवादी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 11:52 IST

गेल्या आठवड्यामध्ये जवानांना अन्नातून विषबाधा करून संपवण्याचा कट रचल्याचे समोर आले होते.

औरंगाबाद : गेल्या महिन्यात ताब्यात घेण्यात आलेल्या मुंब्रा आणि औरंगाबाद येथील दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याच्या संशयातून खुलताबात येथील एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतले आहे. 

गेल्या आठवड्यामध्ये जवानांना अन्नातून विषबाधा करून संपवण्याचा कट रचल्याचे समोर आले होते. या पार्श्वभुमीवर ही कारवाई केल्याचे समोर येत आहे. खुलताबाद येथील एका डॉक्टरची 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी केली होती. हा डॉक्टर इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रभावित असल्याचाही संशय होता.

 तसेच एटीएसने अटक केलेल्या संशयितामार्फत जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याचा दावाही एटीएसने विशेष न्यायालयासमोर केला होता. यामुळे या डॉक्टरचेही दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचा संशय एटीएसला होता. 

एटीएसने सलमान खान, फहाद शाह, झमेन  कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयित आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडून काही रसायने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, धारदार चाकू, मोबाईल्स आणि सिम कार्ड्स पोलिसांनी हस्तगत केले आहे. आयसिस या आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीने प्रेरित होऊन दहशतवादी टोळी बनविण्याचे व दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे कट रचून त्या दृष्टीने साहित्याची जमवाजमव केल्याचे निष्पन्न होत असल्याने ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा १९६७ कलम १८, २०, ३८, ३९,भा . दं. वि. कलम १२० (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काही अतिरेकी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न होताच एटीएसच्या सुमारे १२ पथकांनी औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आठ ठिकाणाहून ९ जणांना ताब्यात घेतले. या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन म्हणजेच १७ वर्षाच्या आहे. 

त्यांचेही कनेक्शनदोन वर्षांपूर्वी मुंबई एटीएसने मुंब्रा भागातून मुदब्बीर शेख या इसिसच्या भारताच्या कमांडरला अटक केली होती. नंतर तेथूनच निझाम शेख उर्फ उमर याला बेड्या ठोकल्या. त्याचा आणि ९ जणांचा संबंध आहे का, या दिशेनेही एटीएस तपास करत आहे.

औरंगाबादमध्ये यांना घेतले ताब्यातऔरंगाबाद येथून मोहंमद मोहसीन सिराजउल्लाह खान, त्याचा मेहुणा काजी सरफराज, मोहंमद तकीउल्लाह सिराज खान यांना ताब्यात घेतले. मोहसीनचा दुसरा मेहुणा मोहंमद मुशाहेदुल इस्लाम यालाही ताब्यात घेतल्याचे समजते.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसAurangabadऔरंगाबाद