लग्नाच्या आमिषाने शिक्षिकेवर अत्याचार

By Admin | Updated: February 20, 2017 17:05 IST2017-02-20T17:05:13+5:302017-02-20T17:05:13+5:30

लग्नाचे आमिष दाखवून एका शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस

Atrocity against the teacher by marriage bait | लग्नाच्या आमिषाने शिक्षिकेवर अत्याचार

लग्नाच्या आमिषाने शिक्षिकेवर अत्याचार

>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 20 - लग्नाचे आमिष दाखवून भुसावळ येथील एका शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. फैजपूर येथील एका विद्यालयातील शिक्षिकेवर भुसावळमधील तरुणाने अत्याचार केल्याचा बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी चेतन नारायण भंगाळे (वय ३१, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ), त्याचे वडील नारायण भंगाळे, आई शोभा भंगाळे, बहिण ललिता कैलास कुरकुरे व मेहुणे कैलास कुरकुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, मुख्य आरोपी चेतनने अनेकदा तरुणीवर ठिकठिकाणी अत्याचार करून गर्भपात केल्याचा आरोप करण्यात आला असून अन्य आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे.  सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल तपास करीत आहेत.

Web Title: Atrocity against the teacher by marriage bait