शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी मूल्यमापन कक्ष; शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 07:47 IST

राज्यातील अध्ययन स्तरांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये राज्याला शैक्षणिक आणि तांत्रिक साह्य प्रदान करणे. 

मुंबई : शिक्षण पद्धतीतील अध्यापन, अध्ययन आणि परिणाम यांच्या बळकटीकरणासाठी राज्यात लवकरच राज्य मूल्यमापन कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पद्धती अद्ययावत करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राज्य मूल्यमापन कक्षाची स्थापना पुणे येथे करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला. 

मूल्यमापन कार्यपद्धती, मूल्यमापनाशी निगडीत शिक्षकांची प्रशिक्षणे, विविध प्रकारच्या चाचण्या व सर्वेक्षणांचे आयोजन, तसेच मूल्यमापनासंबंधी अनुषंगिक बाबी इत्यादीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शिक्षण पद्धतीतील अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण या केंद्र पुरस्कृत प्रकल्पांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथील मूल्यमापन विभागांतर्गत मूल्यमापन कक्षाची स्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. 

कक्षाची उद्दिष्ट्ये काय ?राज्यातील अध्ययन स्तरांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये राज्याला शैक्षणिक आणि तांत्रिक साह्य प्रदान करणे. अध्ययन मूल्यमापनाचा अभ्यास करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावरील विविध भाग धारकांमध्ये क्षमता निर्माण करणे. मूल्यमापन पद्धतीमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करणे, इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपेढी निर्मिती करणे. विद्यार्थी संपादणुकीचे सातत्यपूर्ण मूल्यांकन करून गुणवत्ता समृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना करणे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करणे, सहाध्यायी मूल्यांकन वर्ग मूल्यांकन, साप्ताहिक परीक्षा घेणे. मासिक प्रगती अहवाल निर्मिती इ. वर लक्ष केंद्रित करणे. शाळा आधारित मूल्यमापनासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन करणे. राज्याच्या शालेय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय निकषांच्या आधारे सुधारणा करणे.

कोणाच्या अधिपत्याखाली?राज्य मूल्यमापन कक्ष हा संपूर्णपणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिपत्याखाली कार्यरत राहील. त्यानुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमधील मूल्यमापन विभागाच्या समन्वयाने राज्य मूल्यमापन कक्ष काम करेल. राज्य मूल्यमापन कक्षाच्या कामकाजासाठी आवश्यक मंजूर निधी स्टार्स प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांना उपलब्ध करून देण्यात येईल. समग्र शिक्षा अंतर्गतदेखील राज्य मूल्यमापन कक्षाकरिता तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Schoolशाळा