शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा बरखास्त होणार नाही - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 06:43 IST

पायाखालची जमीन सरकल्याने, विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य विरोधक करत आहेत. मात्र सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पालघर  - पायाखालची जमीन सरकल्याने, विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य विरोधक करत आहेत. मात्र सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राज्य सरकार बरखास्त करून लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल औरंगाबाद येथे केले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, चव्हाणांचे विधान चुकीचे असून त्यांना भविष्य वर्तवण्याची सवय लागली आहे. पालघर येथील नूतनीकरण केलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यानंतर, त्यांनी भूकंपाबाबत आढावा बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते.हे सरकार विकासाचे अनेक निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी येथे मच्छीमार-संवाद कार्यक्रमात सांगितले. नीलक्रांती व सागरमाला योजनेंतर्गत मासेमारी व्यवसायाला मोठी मदत होणार असून, ४० विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे ते म्हणाले; तसेच राज्य शासनाने पाठविलेले सर्व प्रस्ताव केंद्राने मान्य केले असून, किनाऱ्यावर जेट्टी उभारण्यासाठी १७३ कोटी तर फिशिंग हार्बर व १२ प्रस्तावित जेट्टीसाठी २४० कोटी रुपये दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक