शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

विधानसभेचे सभागृह रिते झाले

By admin | Updated: February 17, 2015 02:17 IST

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिवंगत प्रमोद महाजन २००४ सालच्या निवडणूक प्रचाराच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, राजकारणात विरोधक असतात...

संदीप प्रधान - मुंबईभाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिवंगत प्रमोद महाजन २००४ सालच्या निवडणूक प्रचाराच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, राजकारणात विरोधक असतात... विरोध करायचाच असतो... मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्या गोपीनाथबरोबर विलासराव नसतील, आर. आर. पाटील नसतील तर तुम्हा पत्रकारांना तरी ते सभागृह कव्हर करायला मजा येईल का? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही भूमिका मांडणारे महाजन यांची लागलीच हत्या झाली तर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आता आर. आर. पाटील यांनीही नियतीच्या आदेशावरून कायमचा सभात्याग केला आणि विधानसभेचे सभागृह रिते झाले...राज्यातील विधानसभा निवडणुकीकरिता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी त्या वेळी झडत होत्या. विलासरावांना निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावरून दूर केले होते. त्या वेळी विलासरावांना लक्ष्य करण्याबाबत महाजन यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या मनातील सत्ताधारी-विरोधक संघर्षाची भावना अशी मोकळेपणाने मांडली होती. त्यानंतर अल्पावधीत महाजन यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण यांनी गोळ्या झाडल्या. मृत्यूशी ११ दिवस झुंज दिल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपातील महाजन-मुंडे पर्व महाजन यांच्या निधनाने संपले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचे शरद पवार यांचे रेकॉर्ड विलासराव देशमुख यांनी मोडले. २००९च्या निवडणुकीपूर्वी देशमुख यांनी माणिकराव ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी आणले होते. मात्र अचानक २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि अगदी अखेरच्या क्षणी राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ट्रायडंट हॉटेलला दिलेल्या भेटीमुळे देशमुखांचे पद गेले. देशमुख यांच्या कारकिर्दीला येथून उतरती कळा लागली. त्यांच्या प्रकृतीबाबत कुजबुज सुरू झाली. देखणे, रूबाबदार विलासराव कृष अवस्थेत पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला. त्यानंतर त्यांचे निधन झाले. महाजन यांच्या पश्चात भाजपाने जवळपास एक तप संघर्ष केल्यावर केंद्रात भाजपाची सत्ता आली. गोपीनाथ मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रयत्नपूर्वक का होईना समावेश झाला. ग्रामविकासासारखे आवडीचे खाते मुंडे यांना मिळाले. परंतु दिल्लीत अचानक झालेल्या मोटार अपघातात मुंडे यांचे निधन झाले. आर. आर. पाटील यांचे नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर राष्ट्रवादीच्या वतीने एकमेव भाषण झाले. कालपर्यंत आम्ही सत्ताधारी होतो आज आम्ही विरोधात आहोत पण पाच वर्षांत आम्ही पुन्हा सत्ताधारी असू, असे ठणकावून सांगणारे आबा त्यांच्या काही साथीदारांबरोबर ‘सभात्याग’ करून निघून गेले... पुन्हा सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्धार मागे सोडून....