शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

अरबी समुद्रात ‘अशोबा’ चक्रीवादळ!

By admin | Updated: June 9, 2015 03:48 IST

अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘अशोबा’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकते.

मुंबई : अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘अशोबा’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकते. ‘सुपर सायक्लोन’मध्ये रूपांतरित होताना हे चक्रीवादळ उत्तर, वायव्य दिशेने सरकत ओमानच्या दिशेने जात असल्याने भारताला धोका कमीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे समुद्र रौद्ररूप धारण करणार असून कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.मध्यपूर्व अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर गेल्या सहा तासांत वायव्य दिशेने वाटचाल सुरू असताना त्याची तीव्रता वाढून ते सोमवारी सकाळी ८.३० वाजता मुंबईच्या पश्चिम- नैऋत्य दिशेला ४७० किमी अंतरावर वेरावल तसेच ओमानच्या मसिरा बेटावरील ९६० किमी अंतरावरील पूर्व-आग्नेयेकडे असल्याचे वृत्त आहे. पुढील ३६ तासांत त्याची तीव्रता आणखी वाढू शकते, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नमूद केले आहे. (प्रतिनिधी) या चक्रीवादळाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पुढच्या काही तासांत उत्तर आणि वायव्य दिशांना सरकरण्याची शक्यता असून, मुख्यत: या चक्रीवादळाचा प्रवास ओमानच्या दिशेने होत आहे.- शुभांगी भुते, संचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खातेभारताला धोका कमीचचक्रीवादळ भारतात धडकण्याची शक्यता कमीच आहे. आम्ही चक्रीवादळाच्या गतीवर लक्ष ठेवून आहोत. त्याची तीव्रता वाढल्यानंतरच ते कुठे सरकेल याचा अंदाज वर्तवता येईल, असे आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यापासून किंचित दूर सरकले असून त्याच्या प्रभावामुळे कर्नाटक, कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरातमध्ये पुढील २४ तासांत पाऊस पडू शकतो, असे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने स्पष्ट केले आहे. वाऱ्याचा वेग वाढणार कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० कि.मी. राहणार असून कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीमध्ये वारे चक्राकार फिरताना हा वेग ९० ते १०० किमीपर्यंत राहू शकतो. वाऱ्याच्या वेगामुळे कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात समुद्र रौद्ररूप धारण करू शकतो. महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा सुटेल व पुढील ४८ तासांत पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.मान्सून राज्यात दाखलमृग नक्षत्राचा मुहूर्त साधत मान्सून सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले आहे. पुढील ४८ तासांतच तो मुंबईत दाखल होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात रविवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सुखद दिलासा दिला होता. यादरम्यान वीज कोसळून राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. मान्सूनपूर्व पावसाला चोवीस तास उलटत नाहीत तोवर मान्सून सोमवारी गोव्यासह महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य मौसमी पाऊस दक्षिण कोकणाच्या काही भागात आणि गोव्यात सोमवारी दाखल झाला आहे. नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा आणखी उत्तरेकडे सरकली आहे. त्यानुसार, नैऋत्य मौसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण कोकणाच्या काही भागात, उर्वरित कर्नाटक व दक्षिण कर्नाटकच्या किनारपट्टीच्या काही भागात दाखल झाला आहे.नैऋत्य मौसमी पाऊस पुढील ४८ तासांत मध्य अरबी समुद्र, कोकण व कर्नाटकच्या आणखी काही भागात, उर्वरित तामिळनाडू, रायलसीमा व आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या काही भागात, मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असेही हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.