शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, कॅबिनेट बैठकीतून पडले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 19:01 IST

Ashok Chavan: अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा ते कॅबिनेट बैठकीला हजर होते. रिपोर्ट कळताच ते मंत्रिमंडळाची बैठक सोडून बाहेर पडले.

मुंबई: मागील काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेकांना दुसऱ्यांदा कोरोना झालाय. या यादीत आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव आले आहे. चव्हाणांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांचा काेराेना चाचणी अहवाल गुरूवारी सायंकाळी पाॅझिटिव्ह आला. गेली चार दिवस अशाेकराव चव्हाण नांदेडमध्ये हाेते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे भुमिपुजन, उद्घाटन केले. प्रजासत्ताक दिनी ध्वजाराेहण केले, त्यानंतर ते दुपारी मुंबईला रवाना झाले. त्यांना गुरूवारी रात्री गाेवा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पणजी येथे जायचे हाेते. मात्र, अंगात किंचित ताप वाटल्याने त्यांनी काेराेना चाचणी केली.

दरम्यान, ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित हाेते. आपला अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे कळताच ते या बैठकीतून बाहेर पडले. मात्र त्यांना काेणताही त्रास जाणवत नसल्याचे सांगण्यात आले. आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही खबरदारी म्हणून काेराेना चाचणी केली जात आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच काेराेना चाचणी करून घ्यावी, आराेग्याची काळजी घ्यावी व काेराेना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

शरद पवारांना कोरोनाची लागणराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 24 जानेवारीला त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः पवार यांनी दिली. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. शरद पवारांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

राज्यातल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागणगेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही कोरोनाने शिरकाव केला. त्यात राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित झाले. त्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस