शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:07 IST

मागील वर्षी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मानाच्या १० पालख्यांसोबत वारीला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता

Pandharpur Wari 2025: आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. ६ जुलैला आषाढी वारी असून त्याआधीच अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होता. मुखी हरीनामाचा गजर आणि ग्यानबा तुकाराम जयघोष करत लाखो वारकरी पंढरीला जातात. मात्र याच वारकऱ्यांचा विसर सरकारला पडला का असा प्रश्न विचारला जात होता. मागील वर्षी पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्यात आली होती परंतु यंदा वारी सोहळा जवळ आला तरी मदत न मिळाल्याने वारकरी नाराज झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

आषाढी वारीनिमित्त सरकार मानाच्या १० पालख्यांसोबतच ११०९ दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये अनुदान देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मागील वर्षी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मानाच्या १० पालख्यांसोबत वारीला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून प्रत्येक दिंडीला २० हजारांची मदत केली होती. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी राज्य सरकारने वारीसाठी २ कोटी २१ लाख ८० हजारांचे अनुदान मंजूर केले आहे. पंढरपूरला येणाऱ्या मानाच्या १० पालख्यांसोबतच ११०९ दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये दिले जाणार आहेत. 

"वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा"

आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठक अजितदादांनी घेतली. पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूने खोदाई सुरू असल्याने पावसाने दगड रस्त्यावर येऊन वारकऱ्यांना धोका होऊ उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. 

राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २००  विशेष बसेस

दरम्यान, आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर