शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्ष ठरवाच, तोवर समिती नेमा; सामूहिक निर्णय प्रक्रियेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 14:26 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची अहवालात शिफारस

सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याचा विचार करेपर्यंत प्रदेश काँग्रेसशी, मित्रपक्षांशी करावयाच्या आघाडीशी तसेच निवडणुकांशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या विधिमंडळातील गटनेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी शिफारस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी आपल्या अहवालात केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली आहे. त्यामुळे पटोले प्रदेशाध्यक्षपदी राहावे की नाही या मुद्याला चेन्निथला यांनी आपल्या अहवालात बगल दिली आहे पण पटोले यांच्या निर्णयांशी पक्षातले ज्येष्ठ नेते सहमत होत नसल्यामुळे प्रदेश काँग्रेसशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची एक समिती स्थापन करून सामूहिक निर्णय प्रणाली अंमलात आणावी, अशी शिफारस त्यांनी केली आहे. काँग्रेसश्रेष्ठींनी चेन्निथला यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नियुक्त करुन अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

चेन्निथला यांच्या शिफारसीनुसार प्रस्तावित समितीत प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या व्यतिरिक्त सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील या नेत्यांचा समावेश होऊ शकेल.

काय आहे चेन्निथला यांच्या अहवालात?

  • लोकसभा निवडणुकीची उलटगणती सुरू झाली असतानाच प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून नाना पटोले यांना हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पटोले यांना हटविण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली दरबारात त्यांचे विरोधक सतत धडकत असताना पटोलेसमर्थकही दिल्लीत सक्रिय झाले आहेत.
  • प्रदेशाध्यक्षपदी पटोले असावेत की नाही, या भानगडीत न पडता तो निर्णय काँग्रेसश्रेष्ठींनी घ्यावी, असे नमूद करून राज्यात काँग्रेस पक्षाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ व अनुभवी नेत्यांची समिती स्थापन करावी, असा मधला मार्ग सांगणारी शिफारस चेन्निथला यांनी आपल्या अहवालात केल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली.
टॅग्स :congressकाँग्रेस