शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 06:57 IST

भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी; सहा स्कूबा डायव्हर्सची ३ तासांत कामगिरी

संदीप बोडवेमालवण : वनशक्ती या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणात कार्यरत असलेले पर्यावरणवादी दयानंद स्टॅलिन यांनी आता सागर शक्ती या उपक्रमांतर्गत सागरतळाची स्वच्छता करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. यासाठीच्या पथदर्शी प्रयोगाची सुरुवात बुधवारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला परिसरातील समुद्रातून करण्यात आली. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. समुद्रतळाच्या एक हेक्टर परिसरातून सहा स्कूबा डायव्हर्सनी ३ तासात ३०० किलो प्लास्टिक कचरा बाहेर काढला.

मासेमारी, पर्यटन उद्योगावर परिणामस्टॅलिन दयानंद म्हणाले, समुद्रात सूक्ष्म प्लास्टिक वाढत आहे. यातून मानवाला कॅन्सरसारख्या रोगांचा धोका आहे. वाढत्या समुद्री कचऱ्याच्या समस्येवर काम करताना मालवण येथून सुरुवात केली आहे. येथील समुद्रतळ जैवविविधतेने समृद्ध आहे. याठिकाणी समुद्री कचऱ्याचीही समस्या मोठी आहे. याचा परिणाम येथील सागरी जैवविविधतेवर पर्यायाने मासेमारी व पर्यटन उद्योगावर होत आहे.

कचऱ्यात काय मिळाले...१) प्लास्टिक बॉटल्स २) प्लास्टिक पिशव्या ३) खाद्य पदार्थांची वेष्टने ४) काचेच्या बॉटल्स ५) तुटलेली जाळी ६) अडकलेले सागरी जीव.

...यांनी राबविली मोहीमवन शक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभाग यांच्या सहकार्याने, सागर शक्ती, मालवण नगर परिषद, महाराष्ट्र वन विभाग, यूथ बीट फॉर क्लायमेट, नीलक्रांती आदी संस्थांनी एकत्रित येत ही मोहीम राबविली.

शून्य प्लास्टिक क्षेत्रासाठी प्रयत्न करणारसागरी तळाच्या स्वच्छतेच्या पथदर्शी प्रकल्पाला आता सुरुवात झाली असली तरीही आम्ही दीर्घ काळाच्या योजनेवर काम करणार आहोत. मालवणचा समुद्र किनारा आणि समुद्राचे पाणी स्वच्छ करणे, हा आमचा संकल्प आहे. भविष्यात सिंधुदुर्ग शून्य प्लास्टिक क्षेत्र होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत.     -स्टॅलिन दयानंद, पर्यावरणवादी 

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनारा