शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

अरुण गवळीला रजा नाहीच, संचित रजेस अपात्र

By admin | Updated: March 8, 2017 19:15 IST

सुधारित नियमानुसार मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी हा संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी अपात्र आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 8 - सुधारित नियमानुसार मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी हा संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी अपात्र आहे. त्याला संचित रजा मंजूर केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याची संचित रजेची याचिका खारीज करण्यात यावी, असे उत्तर राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले.शासनाने अभिवचन रजा (पॅरोल) व संचित रजा (फरलो) नियमामध्ये सुधारणा केली असून, त्यासंदर्भात २८ आॅगस्ट २०१६ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले असेल आणि हे अपील प्रलंबित असेल तर, सदर आरोपीला संचित रजा दिली जाणार नाही अशी तरतूद नियम ४(११) मध्ये करण्यात आली आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. हे अपील प्रलंबित आहे. परिणामी त्याला संचित रजा दिली जाऊ शकत नाही असे शासनाच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.गवळीने संचित रजेसाठी सुरुवातीला कारागृह उपमहानिरीक्षकाकडे अर्ज सादर केला होता. निवडणुकीचे दिवस असल्याचे कारण देऊन त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. या निर्णयाला गवळीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होईल. गवळीला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. गवळीतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.