शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अरुण अडसड यांना भाजपाची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 04:13 IST

विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपाने माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक ३ आॅक्टोबरला होत आहे.

मुंबई  - विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपाने माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक ३ आॅक्टोबरला होत आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. फुंडकर हे विदर्भातील जुने नेते होते त्यांच्या जागी त्यांच्याच पिढीचे असलेले अडसड यांना पक्षाने संधी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. फुंडकर यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २४ एप्रिल २०२० ला संपणार होती. त्यांच्या निधनाने रिक्त होत असलेल्या जागेची निवडणूक होत असल्याने नवीन आमदारांचा कार्यकाळही २४ एप्रिल २०२० पर्यंत असेल.अडसड यांचा प्रवास संघ, जनसंघ आणि भाजपा असा राहिला आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि युतीची सत्ता आली. त्या वेळी त्यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी केवळ ९७४ मतांनी पराभव केला होता.पुन्हा भाजपाची सत्ता आली पण अडसड यांना कोणतीही संधी मिळालेली नव्हती. आता विधान परिषदेवर पाठवून पक्षाने त्यांचे पुनर्वसन केले आहे. सांगली जिल्ह्यातील भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाचीही चर्चा होती.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण