शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

लेख: पीओपी मूर्तींबाबत ठोस धोरण आखणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 10:05 IST

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बनवण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते.

ॲड. नरेश दहिबावकरअध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय  समितीप्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बनवण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. साहजिकच अशा मूर्ती बनवायच्या की  नाही याबाबत मूर्तिकारांमध्ये संभ्रम होता. राज्य सरकार आणि गणेशोत्सव समन्वय  समितीने  पाठपुरावा केला. त्यानंतर न्यायालयाने अंतरिम आदेश देत  पीओपीवरील बंदी उठवली.  त्यानंतर  विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावर तोडगा काढण्यातही वेळ गेला. त्यामुळे पीओपी मूर्तींबाबत निश्चित धोरण असावे यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला विश्वासात घेऊन निश्चित धोरण आखणे गरजेचे आहे, अशी भूमिका बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत मांडली.  

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची  संख्या वाढत आहे का ?- शहर भागात मंडळांची संख्या वाढलेली नाही. मात्र उपनगरांत ती वाढत आहे. याचे कारण म्हणजे या भागात अनेक ठिकाणी उत्तुंग  टॉवर झाले आहेत. त्यांत किमान १०० कुटुंबे राहतात. त्यांच्या सोसायट्यांनी  सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले आहेत.  त्यामुळे उपनगरांत मंडळांची संख्या वाढल्याचे दिसते. 

‘एक गाव -एक गणपती’ ही  संकल्पना मुंबईत राबवता येऊ शकते का ?- नाही! मंडळांची स्थापना पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली झाली आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर अधिष्ठान आहे. साहजिकच त्यांना उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. अशी अनेक मंडळे आहेत. त्यामुळे ‘एक गाव - एक गणपती’ ही संकल्पना मुंबईत अमलात येणे अशक्य आहे.

 मंडळांनी राजकारणापासून दूर राहण्याचे आवाहन समितीने का केले?- मंडळांमध्ये राजकारण आणि राजकीय मंडळींचा शिरकाव नको, अशी आमची भूमिका आहे.  उत्सवात सर्व धर्मांचे, जातिपातींचे लोक सहभागी होतात, वर्गणी देतात. मंडळे ही कार्यशाळेसारखी  असतात. विविध उपक्रम राबवतात. त्यातून कार्यकर्ते घडतात.  निवडणुकांच्या निमित्ताने मंडळांमध्ये राजकारणाचा शिरकाव होतो, हे कटाक्षाने  टाळले पाहिजे. त्यासाठी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे, या भूमिकेतून आम्ही तसे आवाहन केले.

मूर्तींच्या उंची वाढत आहेत, त्याविषयी काय भूमिका आहे?- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असताना आम्ही मूर्तीची उंची किती असावी यासाठी समिती नेमली होती. तेव्हा १८ फूट उंचीचा निकष ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यात बदल करून २० फुटांचा निकष ठरवण्यात आला. मूर्तींच्या उंचीबाबत मूर्तिकारांनीच भूमिका घेतली पाहिजे. मंडळांनी मोठ्या मूर्तींची मागणी केली तरी तेवढ्या  उंचीच्या मूर्ती बनवायच्या का? याचा निर्णय त्यांनी घ्यावा.

मंडळांना सरकारी अनुदान कशासाठी हवे आहे?- गणेशोत्सव १० दिवस चालणारा उत्सव नाही, तर मंडळे वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असतात. प्रसंगी ती पदरमोड करतात. विविध उपक्रम राबवताना त्यांना आर्थिक  अडचणी येतात. सरकारने अनुदान दिल्यास त्यांना  असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल.- शब्दांकन : जयंत होवाळ

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025