शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

वसईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

By admin | Updated: July 15, 2017 03:02 IST

युरोप आणि दक्षिण आफ्रीका येथे आढळणाऱ्या ग्रेटर फ्लेमिंगो पक्षांचे वसईत सलग सहाव्या वर्षी आगमन झाले आहे.

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : खासकरून युरोप आणि दक्षिण आफ्रीका येथे आढळणाऱ्या ग्रेटर फ्लेमिंगो पक्षांचे वसईत सलग सहाव्या वर्षी आगमन झाले आहे. त्यांच्यासबोत यंदा अनेक भारतीय स्थलांतरीत पक्षांचेही आगमन झाले आहे. त्यामुळे वसईतील खाडीलगत सध्या रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे मनमोहून घेताना दिसतात. पावसाळा लांबल्याने पक्ष्यांंचे आगमन लांबले असले तरी आणखी स्थलांतरीत पक्षी याठिकाणी येणार असून त्यांचा मुक्काम दोन -अडीच महिने असणार आहे.पावसाळा सुरु झाल्यानंतर वसई-नायगाव दरम्यान, उमेळा-पापडी रस्ता, गास-चुळणे रस्ता, गोगटे सॉल्ट येथील खारटण भागात पाण्याची पातळी वाढते. यात शेवाळे, पाणकिडे, छोटे मासे हे आवडेत खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दरवर्षी फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर येत असतात. आता त्यात चमचे करकोचे, उघड चोच करकोचे, राखी बगळÞे, जांभळे बगळे, ब्राम्हणी घारी, शेकाचे, किंगफिशर, शारटी, कुदळ््या, वारकरी बदक आणि सुरय या भारतीय स्थलांतरीत पक्ष्यांची भर पडली आहे. पावसाळ््यात गुजरात मधुन जास्त प्रमाणात फ्लेमिंगो येत असावेत असा अंदाज नेचर अ‍ॅडव्हेंचर सोसायटी आॅफ ठाणेचे अध्यक्ष सचिन मेन यांनी सांगितले. खारटण भागात पाण्याची पातळी वाढल्यानंतरच स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होत असते. यंदा पावसाळा लांबल्याने या पक्ष्यांचे आगमनही लांबले आहे. येत्या दहा-पंधरा दिवसात वसई -उमेळा रस्ता, गास-चुळणे सनसिटी रस्ता, गोगटे सॉल्ट आणि वसई-नायगाव दरम्यान खारटण भाग रंगीबेरंगी पक्ष्यांनी फुलून जाणार आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे पक्षी पुन्हा परततात. साधारण सप्टेंबर ते आॅक्टोबर दरम्यान पक्षी निघून जातात. पक्ष्यांवर मानवी आक्रमणवसईत हजारोंच्या संख्येने येत असलेले देशी-विदेशी पक्ष्यांना आता स्थानिक लोक लक्ष्य करू लागले आहेत. आदिवासी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्यांनी अन्न म्हणून या पक्ष्यांकडे पहावयास सुरुवात केली आहे. त्यातून दररोज अनेक पक्ष्यांची शिकार केली जात आहेत. तसेच मातीच्या भरावामुळे पक्ष्यांना असुरक्षित वाटून त्यांचे स्थलांतर बंद होण्याची भिती पक्षीमित्र सचिन मेन यांनी व्यक्त केली.सहा इंच चोचीचे फ्लेमिंगोवसईत सध्या फ्लेमिंगोसह अनेक देशी स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरु झाले आहे. चार फूट उंचीचे, गुलाबी रंगाचे, सहा इंच चोचीचे रुबाबदार फ्लेमिंगो हेच येथील मुख्य आकर्षण आहे. फ्लेमिंगो दक्षिण आफ्रिका आणि युरोपमध्ये आढळून येतात. कच्छ रण येथे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे गुजरातचा राज्य पक्षी म्हणून फ्लेमिंगोची ओळख बनली आहे.