शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

बाप्पाच्या आगमनाने मुंबापुरी दुमदुमली

By admin | Updated: August 22, 2016 01:59 IST

संकष्टी आणि रविवार अशा दुहेरी मुहूर्तावर मुंबईतील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचा आगमन सोहळा पार पाडला.

मुंबई : संकष्टी आणि रविवार अशा दुहेरी मुहूर्तावर मुंबईतील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचा आगमन सोहळा पार पाडला. महाराजा, कैवारी आणि राजा अशा नाना रूपांतील उंच आणि आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी मुंबईकरांनी लालबाग, परळ, चिंचपोकळी आणि भायखळा परिसरात तुफान गर्दी केली होती. या वेळी ढोल-ताशाच्या तालावर स्वार झालेल्या कार्यकर्त्यांसोबत गणेशभक्तांनीही आगमन सोहळ्यात एकच कल्ला केल्याचे चित्र दिसले.चिंचपोकळीच्या चिंतामणीसह ग्रँटरोडचा राजा, करी रोडचा कैवारी, गिरणगावातील घोडपदेवचा राजा, खेतवाडीच्या ११व्या गल्लीतील मुंबईचा महाराजा, जिजामातानगरचा राजा अशा नामांकित गणेशोत्सव मंडळांतील बाप्पांचा आगमन सोहळा रविवारी पार पडला. पुणेरी ढोल, नाशिक बाजा, बेन्जो आणि डीजेच्या आवाजाने अक्षरश: मुंबापुरी दुमदुमली होती. प्रत्येक मंडळामध्ये तरुण-तरुणींनी संख्या वाखाणण्याजोगी होती. दुपारच्या वेळी बहुतेक मंडळांनी कार्यशाळांतून गणपतीची मूर्ती बाहेर काढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळवण्यात आली. (प्रतिनिधी)>छायाचित्रकारांची मांदियाळी‘चिंचपोकळीचा चिंतामणी’सह दर्शनासाठी जमलेल्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासाठी शेकडो नवोदित छायाचित्रकारांसह अनुभवी छायाचित्रकारांनीही गर्दी केली होती. आगमन सोहळ्यातील बारकावे आणि गणेशभक्तांचे हावभाव टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी उड्डाणपुलापासून येथील रस्त्यालगतच्या इमारतींच्या गच्चीचा आधार घेतला होता. काही छायाचित्रकार तर झाडांसह मिळेल त्या उंच ठिकाणांवर चढून छायाचित्र घेत होते.>पताकांचा नयनरम्य नजारापरळवरून चिंचपोकळी येथील मंडपाच्या दिशेने निघालेला ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ हा विशेष आकर्षण ठरला. या आगमन सोहळ्यात विविध ढोलपथकांनी ‘चिंतामणी’ला सलामी दिली. ढोलाच्या नादावर भगवी पताका नाचवणारे कार्यकर्ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते; तर पताका नाचवली जात असताना तरुण-तरुणीही त्या तालावर थिरकताना दिसले.