शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सुगंधी कंदिलपुष्पाची यावल अभयारण्यात नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 08:50 IST

वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती अभ्यासक राहुल व प्रसाद सोनवणे यांनी ही नोंद घेतली आहे.

जळगाव : जिल्ह्याच्या उत्तरेला असलेल्या यावल अभयारण्यात अनेक दुर्मीळ व संकटग्रस्त वनस्पतींची नोंद आतापर्यंत झाली असून, आता पुन्हा नव्याने 'सेरोपेजिया ओडोरेंटा' म्हणजेच 'सुगंधी कंदिलपुष्पा'ची नोंद झाली आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती अभ्यासक राहुल व प्रसाद सोनवणे यांनी ही नोंद घेतली आहे.

पश्चिम भारतात प्रदेशनिष्ठ असलेल्या आणि गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्रात अगदी तुरळकपणे ही वनस्पती आढळून येते. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आय.यू.सी.एन.) च्या रेड लिस्टमध्ये अतिसंकटग्रस्त  (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून या वनस्पतीचा समावेश आहे. वनस्पती अभ्यासक राहुल व प्रसाद सोनवणे यांचा या वनस्पती संबंधीचा शोधनिबंध  'बायोनेचर' या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. 

ही नोंद म्हणजे या वनस्पतीचे राज्यातील आढळस्थान ठरले आहे. या संशोधनासाठी त्यांना वनसंरक्षक डिगंबर पगार, सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन तसेच मयूरेश कुलकर्णी, आकाश राऊत, रविंद्र फालक, अमन गुजर, बाळकृष्ण देवरे, वनपाल सुरेश देसले, वनपाल समाधान धनवट, चेतन भावसार यांचे सहकार्य लाभले.

काय आहे वैशिष्ट्य...वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे यांनी सांगितले की, सुगंधी कंदिलपुष्प किंवा खरचुडी ही रुई कुळातील सेरोपेजिया या जातीतील वनस्पती आहे. ही २ मी लांबी पर्यंत वाढणारी वेलसदृश वनस्पती आहे. या वनस्पतीची फुले गुच्छात येतात. एका वेलीला सुमारे २०० फुले येतात. फूले पिवळी, सुगंधी वैशिष्ट्यपुर्ण रचनेची असतात. पाकळ्या खालून नळीच्या आकारात एकत्र येवुन वरील बाजुस पाच भागात विभागल्या जातात आणि कंदिलाप्रमाणे नक्षीदार कळस तयार होतो. म्हणुन या वनस्पतींचे कंदिलपुष्प हे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी केवळ यावल अभयारण्यातच आढळतात. यावरुन अभयारण्याचे जैवविविधता लक्षात येते. असे असूनही अभयारण्य उपेक्षित राहीले आहे.- अश्विनी खोपडे, सहाय्यक वनसंरक्षक, यावल अभयारण्य

टॅग्स :Jalgaonजळगाव